17 April 2025 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

अदानी समूहावरील प्रचंड कर्जावर क्रेडिट एजन्सीकडून चिंता व्यक्त, खूप कर्जामुळे डिफॉल्टर ठरण्याचीही शंका - फिच ग्रुप रिपोर्ट

Adani Group

Adani Group | देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्यावर अदानी समूहावर कर्जाचा मोठा बोजा आहे. हा गट विद्यमान आणि नवीन व्यवसायांमध्ये आक्रमकपणे गुंतवणूक करत आहे, ज्यांना प्रामुख्याने कर्जाद्वारे वित्तपुरवठा केला जातो. यामुळे हा समूह खोलवर म्हणजे खूप कर्जाच्या जाळ्यात अडकला आहे. ‘फिच ग्रुप’ या आंतरराष्ट्रीय पतमानांकन आणि संशोधन कंपनी ‘क्रेडिटसाइट्स’च्या युनिटने नुकत्याच दिलेल्या एका अहवालात ही माहिती दिली आहे.

डिफॉल्टरही ठरू शकतो :
या अहवालात अदानी समूहावरील प्रचंड कर्जाचा संदर्भ देत परिस्थिती आणखी बिघडल्यास हा समूह कर्जाच्या जाळ्यात अडकू शकतो आणि डिफॉल्टरही ठरू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार अदानी ग्रुपच्या कंपन्यांवर मिळून 2.3 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.

बँका आणि केंद्र सरकारशी चांगले संबंधाचा फायदा : क्रेडिट साइट्स
मात्र, ‘फिच ग्रुप’चे कर्ज संशोधन युनिट क्रेडिटसाइट्स यांनी आपल्या अहवालात अदानी समूहावरील प्रचंड कर्जाच्या ओझ्याबाबत चिंता व्यक्त केली असून या उद्योग समूहाचे भारतीय बँका आणि सरकारशी चांगले संबंध आहेत, ही बाब त्यासाठी दिलासादायक असल्याचेही म्हटले आहे. अदानी समूहाच्या प्रतिनिधींनी या अहवालावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दूरसंचार, सिमेंट, वीज ते दीर्घकालीन पायाभूत सुविधांशी संबंधित सर्व प्रकल्पांमध्ये अदानी समूह सातत्याने मोठी गुंतवणूक करत असताना हा अहवाल आला आहे. मंगळवार, २३ ऑगस्ट रोजी अदानी समूहाच्या सातही सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग २ ते ७ टक्क्यांनी घसरले.

अदानी समूहाबद्दलच्या रिपोर्टमधील गोष्टी या आहेत :
१. ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहावर कर्जाचा मोठा बोजा आहे. हा गट सतत आक्रमकपणे जुन्या आणि नव्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करत असतो. गुंतवणुकीसाठी सर्वाधिक भांडवल कर्जातून उभे केले आहे.
२. आक्रमकपणे, सततच्या मोठ्या गुंतवणूकीमुळे कंपनीच्या पतपुरवठ्यावर आणि रोख प्रवाहावर दबाव निर्माण झाला आहे. यामुळे परिस्थिती चिघळल्यास थकबाकीदार होण्याचाही धोका आहे.
३. या कंपन्यांच्या समूहावर कर्जाचा प्रचंड बोजा अशा वेळी आहे, जेव्हा व्याजदर वाढत आहेत, ज्यामुळे हा धोका अधिक गंभीर होऊ शकतो. याशिवाय पायाभूत सुविधांचे प्रकल्प दीर्घकालीन असतात, त्यासाठी भविष्यात अधिक गुंतवणूक करावी लागू शकते.
४. क्रेडिटसाइट्समधील विश्लेषकांच्या मते, गौतम अदानी यांच्या अनुपस्थितीत वरिष्ठ व्यवस्थापन क्षमता समूहासाठी पुरेशी ठरणार नाही, ज्यामुळे विश्लेषकांनी अदानी समूहाला ‘हाय की-मॅन रिस्क’ म्हणून वर्गीकृत केले आहे.
५. अदानी समूह अशा अनेक नवीन व्यवसायांमध्ये प्रवेश करीत आहे ज्यात भांडवलाची आवश्यकता खूप जास्त आहे आणि ज्याबद्दल त्यांना अद्याप अनुभव नाही.
६. रेटिंग एजन्सीच्या मते, अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये प्रवर्तकांची गुंतवणूक खूप कमी राहिली आहे, जी कर्जाचा प्रचंड बोजा कमी करण्यासाठी खूप महत्वाची असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Adani Group is deeply overleveraged Credit sights warns Fitch Group Report check details 23 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adani Group(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या