Adani Group Shares | अदानी ग्रुपच्या स्टॉकमध्ये जबरदस्त आदळ आपट सुरू, नेमकं कारण काय? जाणून घ्या शेअरची किंमत
Adani Group Shares| अदानी समूहाचा भाग असलेल्या बऱ्याच कंपनीच्या शेअर्समध्ये आदळ आपट पाहायला मिळत आहे. अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर या कंपन्यांचे शेअर्समध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील दोन महिन्यांपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे, याचे कर्म म्हणजे हिंडनबर्ग फर्मने अदानी समूहावर गैरकारभाराचा आरोप केला होता.
एमएससीआयने अदानी ट्रान्समिशन कंपनीची रेटिंग केली आहे. फ्री फ्लोट ग्लोबल इंडेक्स प्रोव्हायडर MSCI च्या निर्णयामुळे अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळत आहे. एमएससीआयने या महिन्यात घेतलेल्या आढाव्यात असे आढळले आहे की, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅस कंपनीचे फ्री फ्लोट कमी झाले आहे. एमएससीआयने म्हटले की, आता अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन कंपनीचा फ्री फ्लोट अनुक्रमे 14 आणि 10 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, जो यापूर्वी 25 टक्के होता.
24 जानेवारी 2023 रोजी हिंडेनबर्ग रिसर्च फर्मने अदानी समूहाच्या गैर कारभारावर एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानंतर अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स 65 टक्के घसरले होते. 24 जानेवारी 2023 रोजी अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स 2756.15 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 8 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 949.30 रुपये किमतीवर पोहचले होते.
आज मंगळवार दिनाक 9 मे 2023 रोजी अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 901.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. त्याचप्रमाणे अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 77 टक्के घसरले होते ते आज 3.18 टक्के घसरणीसह 845.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 24 जानेवारी 2023 रोजी 3885.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Adani Group Shares Price Today on 09 May 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल