22 January 2025 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

Adani Group Stocks | अदानी ग्रुपने या २ दिग्गज कंपन्या खरेदी केल्या | शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन धावपळ

Adani Group Stocks

Adani Group Stocks | अदानी समूहाकडे होलसिम ग्रुप या स्विस कंपनीची सिमेंट कंपनी अंबुजा सिमेंट्स लिमिटेड आणि एसीसी लिमिटेड या कंपन्यांचा व्यवसाय असेल. हा करार सुमारे १०.५ अब्ज डॉलरचा (८० हजार कोटी रुपये) आहे.

The Adani Group will own the business of the Swiss company Holcim Group’s cement company- Ambuja Cements Ltd. and ACC Ltd :

बोली अदानी समूहाने जिंकली :
अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने मोठा दणका दिला आहे. होलसिम समूहाचा भारतीय व्यवसाय विकत घेण्याची बोली अदानी समूहाने जिंकली आहे. आता अंबुजा सिमेंट्स लिमिटेड आणि एसीसी लिमिटेड या होलसिम समूहाच्या सिमेंट कंपनीचा व्यवसाय अदानी समूहाच्या मालकीचा असणार आहे.

दोन बड्या दिग्गजांची बोली :
देशातील प्रसिद्ध सिमेंट ब्रँड अंबुजा आणि एसीसी खरेदी करण्यासाठी दोन बड्या भारतीय व्यावसायिकांमध्ये शर्यत लागली होती. अदानी समूहाशिवाय सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्ल्यू ग्रुपही या शर्यतीत सहभागी होता. त्याचबरोबर तांत्रिक कारणामुळे अल्ट्राटेक सिमेंट या शर्यतीत थोडं मागे पडलं.

होलसिम ग्रुप बद्दल :
होलसिम ग्रुप सुमारे 17 वर्षांपासून भारतात व्यवसाय करत आहे. होलसिमची ओळख भारतात प्रामुख्याने अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेडच्या माध्यमातून होते. अंबुजा सिमेंट, एसीसी लि. भारतीय शेअर बाजारात लिस्टेड आहेत.

अंबुजा सिमेंटचे बाजारमूल्य :
अंबुजा सिमेंटचे बाजारमूल्य 70 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. होलसिम कंपनीचे ६३.१९% मालकीचे आहेत, तर एसीसीचे बाजार भांडवल ४०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्यापैकी स्विस कंपनीचा ५४.५३% हिस्सा आहे. अदानी सिमेंट इंडस्ट्रीज या नावाने अदानी समूहाने गेल्या वर्षी सिमेंट क्षेत्रात प्रवेश केला होता. एसीसीच्या टेकओव्हरनंतर तो सिमेंट क्षेत्रातला मोठा खेळाडू बनेल.

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी या करारावर म्हणतात, “भारताचा स्टोरीवरचा आमचा विश्वास अढळ आहे. भारतातील होलसिमच्या सिमेंट कंपन्यांना आपली हरित ऊर्जा आणि रसद यांची जोड दिल्यास ती आपल्याला जगातील सर्वात ग्रीन सिमेंट कंपनी बनवेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Adani Group Stocks Ambuja ACC in focus after acquisition check details 16 May 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x