16 April 2025 7:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअरने काही दिवसातच दिला 115 टक्के परतावा, नेमकं कारण काय?

Adani Port Share Price

Adani Port Share Price | मागील काही दिवसापासून अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी अदानी पोर्ट कंपनीचे शेअर्स सलग पाचव्या दिवशी तेजीत वाढत होते. मागील 8 ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 24 नोव्हेंबर रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 536.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 24 नोव्हेंबर नंतर या कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 115 टक्के वाढ झाली आहे.

तब्बल 8 महिन्यांनंतर अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स पुन्हा 1,000 रुपयेच्या पार गेले आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतपर्यंत अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 67.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 1.88 टक्के वाढीसह 1,178.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील आठवड्यात अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांच्या वाढीसह 1,048.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.02 टक्के वाढीसह 1,033.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीच्या शेअरमध्ये देखील गुरूवारी 1 टक्के ते 3 टक्के वाढ पाहायला मिळाली होती.

मीडिया रिपोर्टनुसार अदानी ग्रुप ओडिशा राज्यातील गोपालपूर बंदर ताब्यात घेण्यासाठी शापूरजी पालोनजी ग्रुपसोबत चर्चा करत आहे . हा करार 1100 ते 1200 कोटी दरम्यान होण्याची शक्यता आहे. शापूरजी पालोनजी समुहाकडे गोपाळपूर बंदराचा 56 टक्के मालकी हिस्सा आहे. तर उर्वरित मालकी वाटा ओरिसा स्टीव्हडोरेस कंपनीकडे आहे. याशिवाय, अदानी समूहातील कंपन्याच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, एका अमेरिकन सरकारी संस्थेने हिंडेनबर्ग प्रकरणात अदानी समूहाला क्लीन चिट दिली आहे.

अदानी समूहाने 553 दशलक्ष डॉलर्स कर्ज उभारणी करण्यासाठी अमेरिकन एजन्सीसोबत संपर्क केला होता. तथापि कर्ज देण्यापूर्वी या अमेरिकन एजन्सीने स्वतःच्या तज्ञाकडून हिँडेनबर्ग कंपनीने अदानी समूहावर केलेल्या आरोपांची तपासणी केली. आणि त्यात सिध्द झाले की, हे आरोप खोटे निघाले आहेत. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने आठ आंतरराष्ट्रीय बँकांच्या संघाकडून तब्बल 1.36 अब्ज डॉलर्स कर्ज उभारणी केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Port Share Price NSE 11 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Adani Port Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या