13 November 2024 5:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तुफान स्टॉक खरेदी सुरु

Adani Port Share Price

Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 2.37 टक्के वाढीसह 1384.90 रुपये किमतीवर पोहचले होते. 3 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1607.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. तर 23 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 702.85 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीची चर्चा करण्याचे कारण, कंपनीला कोलकाता बंदरातील कंटेनर टर्मिनलच्या ऑपरेशन आणि देखभालीचे काम मिळाले आहे. शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी अदानी पोर्ट्स स्टॉक 1.85 टक्के वाढीसह 1,378 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

अदानी पोर्ट्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.97 लाख कोटी रुपये आहे. शुक्रवारी या कंपनीचे एकूण 2.71 लाख शेअर्स ट्रेड झाले, ज्याचे एकूण मूल्य 37.24 कोटी रुपये होते. अदानी पोर्ट्स कंपनीच्या स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 1.3 आहे, जो या कालावधीत उच्च अस्थिरता दर्शवतो. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन ही कंपनी भारतातील सर्वात मोठी पोर्ट डेव्हलपर-कम-ऑपरेटर कंपनी म्हणून ओळखली जाते. नुकताच अदानी पोर्ट्स कंपनीने कोलकाता मधील प्रसाद मुखर्जी बंदरसाठी बोली प्रक्रियेद्वारे पाच वर्षांचा O&M करार जिंकला आहे.

अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 85.38 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्टॉकचा RSI 49 वर आहे, म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स आपल्या 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस, 200 दिवसाच्या सरासरी मुविंग किंमत पातळीच्या वर आणि 5 दिवस आणि 10 दिवसांच्या मुविंग किंमत पातळीच्या खाली ट्रेड करत आहे.

अदानी पोर्ट्स कंपनीच्या संचालक आणि CEO अश्वनी गुप्ता यांनी म्हंटले आहे की, कोलकत्तामधील नेताजी सुभाष डॉकमधील कंटेनर हाताळणी सुविधेसाठी O&M कराराचा पुरस्कार देशातील बंदरे आणि लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्याची आमची वचनबद्धता आणि व्यवसाय वाढीची संभाव्य क्षमता अधोरेखित करतो. अदानी पोर्ट्स कंपनी दोन दशकांपेक्षा जास्त काळ भारतातील आणि बाहेरील कंटेनर टर्मिनल्सचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करत आहे. यामुळे कंपनीचे ग्राहक आणि देशाला मोठा फायदा होत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Port Share Price NSE Live 08 June 2024.

हॅशटॅग्स

Adani Port Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x