
Adani Ports Share Price | ‘हिंडेनबर्ग’ संस्थेने अडाणी ग्रुप बाबत अहवाल प्रसिद्ध केला, आणि गौतम अदानी यांच्या सर्व कंपनीच्या शेअर्सला उतरती कळा लागली. सर्व शेअर्स इतके अस्थिर झाले आहेत, की कधी त्यात अप्पर सर्किट लागतो, तर कधी शेअर अचानक लोअर सर्किटवर धडक देतो. आज अदानी समूहाचा भाग असलेल्या ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन’ कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीचे मुख्य कारण म्हणजे ‘नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल’ म्हणजेच NCLT च्या मंजुरीनुसार अदानी पोर कंपनीने ‘कार्लाईल पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. (Adani Ports and Special Economic Zone Ltd)
आज बुधवार दिनाक 5 एप्रिल 2023 रोजी ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन’ कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के वाढीसह 630.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘अदानी पोर्ट्स’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची घसरण झाली होती. सध्या हा स्टॉक 630.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञ ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक’ कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक आहेत. ‘IIFL सिक्युरिटीज’ फर्मचे तज्ञांनी अदानी पोर्ट कंपनीच्या स्टॉकवर 680-720 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.
शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी गुंतवणूकदारांना ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी स्टॉक खरेदी करणारा त्यावर 590 ते 600 रुपयांच्या दरम्यान स्टॉप लॉस लावण्याची शिफारस केली आहे. जाणकारांच्या मते पोर्ट व्यवसाय दिवसेंदिवस नेत्रदीपक पद्धतीने वाढत आहे. त्यामुळे कंपनीच्या महसुलात आणखी वाढ अपेक्षित आहे. त्याचबरोबर कृषी मालाच्या आयातीतही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
मागील 3 महिन्यांपासून ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन’ कंपनीच्या शेअरवर विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांत ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन’ कंपनीचे शेअर्स 23.52 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. BSE निर्देशांकावर हा स्टॉक 630 रुपये जवळ ट्रेड करत आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 1,35,602.72 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























