15 January 2025 9:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा?

Adani Power Share Price

Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स मागील वर्षी 19 मे 2023 रोजी 214 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 600 रुपयेच्या पार गेला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 171 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )

अदानी पॉवर स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 199 टक्के वाढला आहे. आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर स्टॉक 0.87 टक्के घसरणीसह 634.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील तीन वर्षे आणि पाच वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना अनुक्रमे 567 टक्के आणि 1488 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.46 लाख कोटी रुपये आहे. अदानी पॉवर स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 64.2 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही.

अदानी पॉवर स्टॉक आपल्या 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेजपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. भारतात उन्हाळ्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. यावर्षी देशातील विजेची मागणी 260 GW पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

भारतात प्रामुख्याने विजेची निर्मिती औष्णिक प्रकल्पातून केली जाते. यासाठी कोळसा वापरला जातो. अदानी पॉवर आणि इतर वीज उत्पादक कंपन्या भारतातील विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढवू शकतात. यामुळे साहजिकच वीज उत्पादक कंपन्यांना फायदा होऊ शकतो. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, अदानी पॉवर स्टॉक पुढील काळात 700 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र तज्ञांनी गुंतवणुकदारांना या स्टॉकवर 575 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते अदानी पॉवर स्टॉकमध्ये 647 रुपये किमतीवर ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. जर या स्टॉकने ब्रेकआऊट तोडला पुढील काळात शेअर 675 रुपये आणि 730 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र तज्ञांनी गुंतवणूक करताना स्टॉकवर 585 रुपये किमतीचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. InCred इक्विटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, अदानी पॉवर स्टॉक 700 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price NSE Live 18 May 2024.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x