16 April 2025 5:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL
x

Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि वेंदाता सह हे 3 शेअर्स 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग

Adani Power Share Price

Adani Power Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. लवकरच संसदेत अर्थसंकलप सादर होणार आहे. याचा परिमाण शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी आनंद राठी फर्मने 3 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

या शेअरमध्ये येस बँक लिमिटेड, अदानी पॉवर लिमिटेड आणि वेदांता लिमिटेड स्टॉक सामील आहे. तज्ञांच्या मते, या शेअर्समध्ये बजेटच्या दिवशी जबरदस्त उलाढाल पाहायला मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबाबत सविस्तर माहिती.

येस बँक :
आनंद राठी फर्मने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 30 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञानी हा स्टॉक खरेदी करताना गुंतवणुकदारांना 21.75 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 1.21 टक्के घसरणीसह 25.36 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 24.5 रुपये या आपल्या 50 दिवसांच्या DEMA जवळ पोहचला आहे.

अदानी पॉवर :
आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, या स्टॉकला 746 रुपये किमतीवर जबरदस्त प्रतिकार मिळत आहे. तज्ञांच्या मते या स्टॉकने 693 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकमध्ये तेजी निर्माण होण्यासाठी शेअरने 746 रुपये ही प्रतिकार पातळी तोडणे आवश्यक आहे. आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 3.90 टक्के वाढीसह 723.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक आपल्या 50 दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज झाला आहे.

वेदांता :
मागील दोन महिन्यांपासून या कंपनीचे शेअर्स 425-480 रेंजमध्ये व्यवहार करत आहेत. सध्या हा स्टॉक 440 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहे. दैनंदिन चार्टवर हा स्टॉक RSI मंदीच्या विचलनासह ट्रेड करत आहे. सध्या या स्टॉकला 480 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. जर हा स्टॉक प्रतिकार पातळीच्या वर गेला तर शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते. मात्र जोपर्यंत या स्टॉकमध्ये लक्षणीय सुधारणा होत नाही तोपर्यंत तज्ञांनी हा स्टॉक खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 3.96 टक्के घसरणीसह 431 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price NSE Live 23 July 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या