
Adani Power Share Price | आगामी काळात अदानी पॉवर लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये 54 टक्क्यांच्या तेजीचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने एका रिपोर्टमध्ये हे संकेत दिले आहेत. व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ‘अदानी पॉवर लिमिटेड कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यावर योजना आखात आहे.
विशेष म्हणजे देशात कोळशाची उपलब्धताही वाढत आहे. याचा थेट फायदा अदानी पॉवर कंपनीला होऊ शकतो. तसेच देशात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि घराघरांत इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढू लागल्याने विजेच्या मागणीतही वाढ होत आहे. विजेच्या वाढत्या मागणीचा फायदा अदानी पॉवर लिमिटेड कंपनीला होईल असं व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेजने रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेजने रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, ‘सध्याचा अक्षय ऊर्जा स्त्रोत विजेच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यास असमर्थ आहे. देशांतर्गत विजेची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत भरून काढण्यासाठी औष्णिक विजेची क्षमता अधिक वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे अदानी पॉवर कंपनी आपल्या मजबूत क्षमता विस्तार योजनेद्वारे वाढत्या मागणीचा फायदा घेणार आहे.
व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने अदानी पॉवर कंपनी शेअरसाठी 806 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरच्या सध्याच्या पातळीपेक्षा ही टार्गेट प्राईस 54 टक्क्यांनी अधिक आहे. अदानी पॉवर पुढील 24 महिन्यांसाठी ही टार्गेट प्राईस गाठेल असं ब्रोकरेजने म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























