Adani Power Share Price | अदानी गृपचा सर्वात स्वस्त अदानी पॉवर शेअर तेजीत, अदानी ग्रुपच्या शेअर्सची कामगिरी तपासून घ्या
Adani Power Share Price | एकेकाळी जगातील दुसरे आणि भारतील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून प्रसिध्द असलेली गौतम अदानी यांच्या उद्योग समूहातील काही कंपन्यांचे शेअर्स मजबूत कामगिरी करत आहेत. अदानी पॉवर, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, NDTV या कंपन्याचे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 ते 10 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. अदानी एंटरप्रायझेस, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर, अंबुजा सिमेंट्स, ACC कंपन्यांचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 ते 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
अदानी समुहाचे शेअर्स वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये संगितीले आहे की, कंपनीच्या प्रवर्तक समूहाने अदानी एंटरप्रायझेस कंपनीमधील आपली स्टॉक होल्डिंग 69.87 टक्के वरून वाढवून 71.93 टक्के केली आहे आणि अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीमधील स्टॉक होल्डिंग 63.06 टक्के वरून वाढवून 65.23 टक्के केली आहे. ही बातमी प्रसिद्ध होताच गुंतवणूकदारांनी अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NDTV कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 234.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या वाढीसह 2,590 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी समूहाने ग्रीन अमोनिया आणि ग्रीन हायड्रोजनची विक्री करण्यासाठी जपानच्या कोवा ग्रुपसोबत संयुक्त उपक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी समूह आणि कोवा गृप या संयुक्त उपक्रमात 50-50 टक्के गुंतवणूक करणार आहेत.
अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्क्यांच्या वाढीसह 397.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबरला 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 3.36 टक्के घसरणीसह 385.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. 22 ऑगस्ट 2022 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 432.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 फेब्रुवारी 2023 या कंपनीचे शेअर्स 132.55 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. फेब्रुवारी नंतर या कंपनीचे शेअर्स तब्बल 200 टक्के मजबूत झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Adani Power Share Price today on 12 September 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS