22 February 2025 7:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

Adani Power Share Price | अदानी ग्रुपमधील अदानी पॉवर सहित इतर शेअर्समध्ये काय हालचाली, कोणते नफ्यात आणि कोणते तोट्यात?

Adani Power Share Price

Adani Power Share Price | अदानी समुहाचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड, अदानी पॉवर लिमिटेड, अदानी पोर्ट्स अँड एसईझेड आणि इतर सहा कंपनीचे बाजार भांडवल 10 लाख कोटी रुपयेच्या पुढे गेले आहे. अदानी समूहाचा भाग असलेल्या 10 सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 9.96 लाख कोटी रुपयांवरून 14,200 कोटी रुपयांनी वाढून 10.10 लाख कोटी रुपयेच्या पार गेले आहे.

अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 4.55 टक्क्यांच्या वाढीसह 2,400 रुपयेवर ट्रेड करत होते. तर अदानी पोर्ट्स स्टॉक 1.74 टक्क्यांच्या वाढीसह 737 रुपयेवर ट्रेड करत होते. अदानी पॉवर स्टॉक 2.31 टक्क्यांच्या वाढीसह 256.40 रुपयेवर ट्रेड करत होता. तर अदानी टोटल गॅस स्टॉक 1.86 टक्के वाढीसह 656 रुपयेवर ट्रेड करत होते.

अदानी विल्मर स्टॉक 1.61 टक्क्यांच्या वाढीसह 413.45 रुपयेवर ट्रेड करत होते. अंबुजा सिमेंट स्टॉक 1.82 टक्क्यांच्या वाढीसह 439.90 रुपयेवर ट्रेड करत होते. अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 2.23 टक्क्यांच्या घसरणीसह 946.90 रुपयेवर ट्रेड करत आहे. अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स 4.44 टक्क्यांच्या वाढीसह 805 रुपयेवर ट्रेड करत होते. एसीसी कंपनीचे शेअर्स 1.45 टक्क्यांच्या वाढीसह 1818.35 रुपयेवर ट्रेड करत होते. एनडीटीव्ही कंपनीचे शेअर्स 3.42 टक्क्यांच्या वाढीसह 232.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मीडिया रिपोर्टनुसार शेअर बाजार नियामक सेबी अदानी समूहाच्या शेअर्समधील व्यवहारांची तपासणी करत आहे. अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, अंबुजा सिमेंट्स, या तीन कंपन्यांवर इनसाइडर ट्रेडिंगशी संबंधित सिक्युरिटीज कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप अदानी समूहावर करण्यात आला होता.

अदानी पॉवर कंपनीने झारखंड राज्यात गोड्डा जिल्ह्यात दोन 800 मेगावॅटच्या अल्ट्रा- सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्लांटच्या दुसऱ्या युनिटचे व्यावसायिक ऑपरेशन सुरू केल्याने अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अदानी समूहाने 26 जून रोजी जाहीर निवेदनात म्हंटले आहे की, अदानी समूह एक मजबूत कॉर्पोरेट गव्हर्नन्स फ्रेमवर्क चालवत असून सर्व लागू कायदे आणि नियमांचे पालन आणि अमलबजावणी करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price today on 29 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x