15 January 2025 4:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा - Marathi News

Highlights:

  • Adani Total Gas Share PriceNSE: ADANITOTAL – अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनी अंश
  • देशात 13 राज्यांमध्ये CGD नेटवर्क
  • मागील 5 वर्षात दिला 493% परतावा
Adani Total Gas Share Price

Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीने जागतिक कर्जदारांकडून 375 दशलक्ष डॉलर्स भांडवल उभारणी केली आहे. हा निधी कंपनी शहरातील गॅस वितरण (NSE: ADANITOTAL) व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी खर्च करणार आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.60 टक्के वाढीसह 788.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनी अंश)

आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 86,731 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.44 टक्के घसरणीसह 814.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीने मिळवलेला निधी सिटी गॅस वितरण व्यवसायातील सर्वात मोठा जागतिक निधी मानला जात आहे. या निधीचा वापर अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीच्या पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमाला गती देण्यासाठी खर्च केला जाईल. अदानी टोटल गॅस लिमिटेड ही कंपनी अदानी ग्रुप आणि फ्रान्सच्या टोटल एनर्जी यांनी सुरू केलेला एक जॉइंट वेंचर आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीच्या भांडवल उभारणी उपक्रमात BNP पारिबस, DBS बँक, मिझुहो बँक, MUFG बँक आणि सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन यासारख्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी भाग घेतला होता.

देशात 13 राज्यांमध्ये CGD नेटवर्क
या भांडवल उभारणीमुळे अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीला देशात 13 राज्यांमधील 34 अधिकृत भौगोलिक क्षेत्रांमध्ये त्याचे CGD नेटवर्क वेगाने विस्तारण्यास मदत होईल. याचा फायदा भारताच्या 14 टक्के लोकसंख्येला होईल. या विस्तारामुळे पाइप्ड नॅचरल गॅस आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस यांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल. तसेच गॅस आधारित अर्थव्यवस्थेसाठी एक परिसंस्था निर्माण करता येईल.

मागील 5 वर्षात दिला 493% परतावा
अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1259.90 रुपये आणि नीचांक किंमत पातळी 521.95 रुपये होती. मागील एका महिन्यात अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 8 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 15 टक्के घसरली आहे. 2024 या वर्षात अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 21 टक्क्यांनी घसरले आहेत. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 493 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Adani Total Gas Share Price 24 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Adani Total Gas Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x