5 November 2024 6:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅसचे शेअर्स टोटली गॅसवर, घसरण थांबेना, स्टॉकवरील परिणाम सविस्तर वाचा

Adani Total Gas Share Price

Adani Total Gas Share Price | मागील काही दिवसांच्या जबरदस्त पडझडी नंतर अदानी उद्योग समूहातील कंपन्याच्या शेअर्समध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे. अदानी उद्योग समूहाची प्रमुख कंपनी ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स मागील 4 ट्रेडिंग सेशनपासून 100 टक्क्यांनी वधारले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘अदानी एंटरप्रायझेस’ चे शेअर्स 20 टक्के वाढीसह 2158.65 रुपयांवर ट्रेड करत होते. ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनी व्यतिरिक्त ‘अदानी पोर्ट्स’, ‘अदानी विल्मार’, ‘अदानी पॉवर’ या कंपन्यांचे शेअर्स देखील बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वाढले होते. मात्र ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स अजूनही कमजोर पाहायला मिळत आहेत. अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 24 जानेवारी 2023 रोजी हिंडेनबर्ग अहवाल जाहीर झाल्यानंतर 65 टक्के घसरले आहेत. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 1,321.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Total Gas Share Price | Adani Total Gas Stock Price | BSE 542066 | NSE ATGL)

अदानी टोटल गॅस शेअर्समध्ये पडझड :
24 जानेवारी 2023 रोजी BSE इंडेक्सवर ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स 3885.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी टोटल गॅसचे शेअर्स 8 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर 1394.15 रुपयांवर पोहचले आहेत. मागील 11 ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स सुमारे 65 टक्के खाली आले आहेत. अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3998.35 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1394.15 रुपये होती. अदानी टोटल गॅसचे कंपनीचे बाजार भांडवल 1,53,330 कोटी रुपये आहे.

अदानी ग्रीन एनर्जीमध्ये ही घसरण :
अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स हिंडेनबर्ग अहवाल आल्यानंतर 58 टक्क्यांनी खाली आले आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 24 जानेवारी 2023 रोजी ‘अदानी ग्रीन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स 1913.55 रुपयांवर ट्रेड करत होते. 8 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 801.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.78 टक्के घसरणीसह 772.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3048 रुपये होती. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 801.05 रुपये होती. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे बाजार भांडवल 1,26,999 कोटी रुपये आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Total Gas Share Price 542066 ATGL stock market live on 09 February 2023.

हॅशटॅग्स

#Adani Total Gas Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x