16 April 2025 2:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

Adani Total Gas Share Price | स्वस्त झालेल्या अदानी टोटल गॅस शेअरची म्युचुअल फंड कंपन्यांकडून मोठी खरेदी, पुन्हा मल्टिबॅगर होणार?

Adani Total Gas Share Price

Adani Total Gas Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीमध्ये म्युच्युअल फंडांनी मोठी गुंतवणूक केली आहे. फक्त मे महिन्यात म्युच्युअल फंडांनी अदानी टोटल गॅस कंपनीचे 3 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. यामुळे मे महिन्यात अदानी टोटल गॅस स्टॉक टॉप 10 लार्जकॅप स्टॉकमध्ये सामील झाला आहे.

आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मच्या अहवालानुसार भारतातील टॉप म्युच्युअल फंडांनी अदानी टोटल गॅस कंपनीमधील शेअर होल्डिंग 10 लाख शेअर्स वरून वाढवून मे महिन्यात 13 लाख शेअर्सवर नेली आहे. शेअर्सच्या किमतीतील घसरणीमुळे म्युचुअल फंडाच्या शेअर्सचे निव्वळ मूल्य एप्रिल 2023 मध्ये 97 कोटी रुपयेवरून मे 2023 मध्ये 89 कोटी रुपयेवर आले होते. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 2.21 टक्के वाढीसह 668.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील काही महिन्यात अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 30 टक्के महणजेच जवळपास 280 रुपये कमजोर झाले आहे. या स्टॉकच्या खरेदीमध्ये निप्पॉन इंडिया म्युच्युअलने अदानी टोटल गॅस कंपनीचे 3,16,880 शेअर्स म्हणजेच जवळपास 0.01 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. तर आयडीबीआय कॅपिटलचे मे 2023 महिन्याच्या अखेरीस शेअर होल्डिंग्स मूल्य 21.1 कोटी रुपये होते.

दरम्यान, 360 वन अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने अदानी टोटल गॅस कंपनीचे 0.48 कोटी रुपयांचे 5,045 समभाग विकून अदानी टोटल गॅस कंपनीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर एचडीएफसी म्युच्युअल फंड आणि यूटीआय म्युच्युअल फंड यांनी अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीमधील त्यांचे भाग भांडवल अनुक्रमे 32 टक्के आणि 19 टक्के वाढवले आहे.

आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मच्या अहवालानुसार त्यांनी आपले भाग भांडवल 5 लाख शेअर्सवरून मे 2023 मध्ये 6 लाख शेअरपर्यंत वाढवले आहेत. मे 2023 मध्ये एचडीएफसी एएमसीने गुंतवणूक केलेल्या शेअर्सचे बाजार मूल्य 151 कोटी रुपये नोंदवले गेले होते, जे एप्रिल 2023 मध्ये फक्त 89 कोटी रुपये नोंदवले गेले होते. UTI AMC ने गुंतवणूक केलेल्या शेअर्सचे बाजारमूल्य मे 2023 महिन्यात 627 कोटी रुपये नोंदवले गेले होते, जे एप्रिल 2023 मध्ये 405 कोटी रुपयेवर आले आहेत.

अदानी टोटल गैस कंपनीचे शेअर्स YTD आधारे 81.16 टक्के कमजोर झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स जानेवारी 2023 मध्ये 3901 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ते आज 668 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 9.45 टक्के नकारात्मक परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Total Gas Share Price today on 15 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adani Total Gas Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या