17 April 2025 10:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅसचा शेअर खरेदी करावा? शेअर रोज लोअर सर्किट स्पर्श करतोय, नेमकं कारण काय?

Adani Total Gas share

Adani Total Gas Share Price | यावर्षीच्या सुरुवातीला हिंडनबर्ग फर्मने अदानी समुहाच्या कंपनीवर अहवाल जारी केला, आणि अदानी ग्रुपचे शेअर्स क्रॅश झाले. अदानी समूहाने सर्व प्रयत्न करून देखील शेअर काही सावरले नाही. अनेक कंपन्याच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला आहे. यापैकीच एक ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के लोअर सर्किटसह 738.60 रुपये नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

नुकताच अदानी टोटल गॅस कंपनीला सेबीने एएसएम मधून बाहेर काढले आहे. असे असून देखील स्टॉकमधील पडझड काही थांबत नाही. YTD आधारे अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 79.19 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मे 2023 या महिन्यात 11 पैकी आठ ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स घसरणीसह ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 17 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 701.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीच्या लेखा परीक्षकांवर प्रश्न उपस्थित :
अहमदाबाद, गुजरात स्थित चार्टर्ड अकाउंटन्सी फर्मने अदानी टोटल गॅस कंपनीच्या ऑडिटर पदाचा त्याग केला आहे. अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी टोटल गॅस कंपनीचे स्वतंत्र लेखा परीक्षक म्हणून शाह धंधरिया अँड कंपनी यांच्या नियुक्तीवर हिंडेनबर्गच्या अहवालात प्रश्नचिन्ह आणि संशय उपस्थित करण्यात आला होता. यानंतर आता अदानी टोटल गॅस कंपनीच्या ऑडिटरने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हिंडेनबर्ग फर्मच्या अहवालात अदानी ग्रुपवर जे आरोप करण्यात आले होते, त्यांवर SEBI तपास करत आहे. सेबीने तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे सहा महिन्यांचा अतिरिक्त वेळ मागितला होता, मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे.

मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत अदानी टोटल कंपनीच्या निव्वळ नफ्यात 21 टक्क्यांची जबरदस्त वाढ नोंदवली गेली आहे. या तिमाहीत कंपनीचा नफा 20.74 टक्क्यांच्या वाढीसह 97.91 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 81.09 कोटी रुपये नोंदवला गेला होता. ही कंपनी अदानी ग्रुप आणि फ्रान्सच्या टोटल एनर्जी कंपनीचा संयुक्त उपक्रम म्हणून सुरू करण्यात आली होती.

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
Tips 2 Trades फर्मच्या तज्ज्ञांच्या मते, अदानी टोटल गॅस कंपनीचा स्टॉक मंदीच्या गर्तेत अडकला आहे. तेजीच्या ट्रेंडमध्ये हा स्टॉक 940-1,040 रुपयेपर्यंत वाढू शकतो. शेअर इंडिया फर्मचे तज्ञ म्हणतात की, अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर आणखी घसरून 650 रुपयेवर येऊ शकतात. या कंपनीच्या स्टॉकमध्ये मंदीचे संकेत पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांत या कंपनीचे शेअर्स 640-600 रुपयांपर्यंत घसरण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Total Gas share today on 17 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Adani Total Gas share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या