22 January 2025 1:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअरमध्ये 1 आठवड्यापूर्वी गुंतवणूक करणाऱ्यांची गुंतवणूक 25 टक्क्याने घटली

Adani Wilmar Share Price

Adani Wilmar Share Price | अदानी समूहाच्या अदानी विल्मर या कंपनीने गेल्या 6 सत्रांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांचे दिवाळे काढले आहेत. या सहा सत्रांमध्ये अदानी विल्मरच्या शेअरमध्ये २५ टक्के घसरण झाली आहे. सलग ३ दिवसांपासून लोअर सर्किट जाणवत आहे. शुक्रवारी एनएसईवर अदानी विल्मरचे समभाग ५ टक्क्यांच्या खालच्या सर्किटसह ६४६.२० रुपयांवर आले आहेत.

Adani Wilmar, a company of Adani Group, has pauped its investors in the last 6 sessions. Adani Wilmar’s shares have lost 25 percent in these 6 sessions :

या घसरणीचे कारण येथे आहे :
कमजोर लिस्टिंग असूनही अदानी विल्मरच्या शेअरमध्ये उसळी पाहायला मिळत होत्या, पण त्यानंतर आता ही घसरण थांबण्याचं नाव घेत नाहीये. हा शेअर २२७ ते ८७८ रुपयांपर्यंत पोहोचला होता. 2 मे रोजी तो 758 रुपयांवरुन 783 रुपयांवर खुला झाला. 5 मे रोजी हा शेअर 680.20 रुपयांवर बंद झाला आणि आता आज 646.20 रुपयांवर लोअर सर्किट सुरू झाले आहे.

युद्ध आणि महागाईचा परिणाम :
खरे तर युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध आणि महागाईचा परिणाम खाद्यतेलाच्या पुरवठ्यावर आणि मागणीवर झाला आहे. त्यामुळे अदानी विल्मर यांच्या निव्वळ नफ्यात घट झाली आहे. अदानी विल्मर ही खाद्यतेल बाजारातील आघाडीची कंपनी आहे. याचा प्रसिद्ध ब्रँड फॉर्च्युन आहे. फेब्रुवारीमध्ये लिस्टिंग झाल्यापासून अदानी विल्मरने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे.

50 भारतीय कंपन्यांमध्ये स्थान :
अलीकडेच, कंपनीने बाजार भांडवलाच्या बाबतीत पहिल्या 50 भारतीय कंपन्यांमध्ये स्थान मिळवले होते. बाजार भांडवलाने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याने कंपनीने हे यश मिळवले. अवघ्या दोन महिन्यात अदानी विल्मरच्या शेअरमध्ये 250 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Adani Wilmar Share Price decreased by 25 percent check details here 06 May 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x