
Aditya Vision Share Price | शेअर बाजारात असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत, ज्यांनी आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या कंपनीचे नाव आहे, आदित्य व्हिजन. मागील तीन वर्षांत आदित्य व्हिजन या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे.
काही वर्षांपूर्वी आदित्य व्हिजन कंपनीचे शेअर 18 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता या कंपनीचे शेअर्स 2000 रुपयेच्या पार गेले आहेत. आज सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी Aditya Vision कंपनीचे शेअर्स 2.09 टक्के वाढीसह 2,234.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आदित्य व्हिजन कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून देण्यासाठी ओळखले जातात. पोस्ट-कोविड रीबाउंडमध्ये, बिहार स्थित आदित्य व्हिजन कंपनीने आपल्या दीर्घकालीन शेअर धारकांचे पैसे अनेक पट वाढवले आहे. मागील तीन वर्षांत या आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12000 टक्के परतावा कमावून दिला आहे.
आदित्य व्हिजन ही कंपनी मॉडर्न मल्टी-ब्रँड कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन कंपनी आहे. हा कंपनीच्या स्टॉकमध्ये मागील एका महिन्यात 37.85 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 58.73 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. त्यामुळे, कोविड नंतरच्या रॅलीमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत अनेक पटींनी वाढली आहे.
आदित्य व्हिजन या कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने 2023 च्या पहिल्या तिमाहीत जबरदस्त आर्थिक निकाल जाहीर केले होते. 11 मार्च 2020 रोजी आदित्य व्हिजन कंपनीचे शेअर्स 18 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 28 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2189.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2465 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 879.50 रुपये होती. जर तुम्ही 2020 साली आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 18 रुपये किमतीवर 5555 शेअर्स मिळाले असते. आणि आता च्या किमतीनुसार तुमच्या 5555 शेअरची किंमत 1,21,65,450 रुपये झाली असती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























