23 November 2024 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News
x

Advik Capital Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत 2.50 रुपये, अॅडविक कॅपिटल पेनी शेअर अल्पावधीत मालामाल करतोय

Advik Capital Share Price

Advik Capital Share Price | अॅडविक कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उसळी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 53 कोटी रुपये आहे. अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.16 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1.96 रुपये होती.

मागील 1 महिन्यात अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्के नफा मिळवून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के वाढीसह 2.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 2.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक पुन्हा अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. 4 नोव्हेंबर 2020 रोजी हा कंपनीचे शेअर्स 0.29 रुपये हा आपल्या नीचांक किंमत पातळीवरून 8 पट अधिक वाढले होते.

अॅडविक कॅपिटल लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले होते, की शनिवार दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये कंपनीचे संचालक आपल्या गुंतवणूकदारांना राइट्स इश्यूचा लाभ देण्याचा निर्णय घेऊ शकतात. सोबतच राइट इश्यू आणि पेमेंट मशिनरी आणि राइट इश्यूचे हक्क या बाबींची चर्चा होण्याची शक्यता आहे.

11 एप्रिल 2023 रोजी अॅडविक कॅपिटल कंपनीने राइट्स इश्यू बाबत शेअर धारकांची मंजुरी मागवली होती. आणि 18 मे 2023 रोजी टपाल मतपत्रिकेद्वारे शेअर धारकांनी राइट्स इश्यू द्वारे भांडवल उभारणीची योजनेवर मंजूरी दिली. अॅडविक कॅपिटल कंपनी राइट्स इश्यूच्या माध्यमातून 50 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करेल.

या राइट्स इश्यूमध्ये कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स राइट्स इश्यूच्या स्वरूपात ऑफर करणार आहे. अॅडविक कॅपिटल ही कंपनी नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना आवश्यक भाडेपट्टी, वित्त, गुंतवणूक आणि इतर कॉर्पोरेट भाडेपट्टीबाबत सल्ला देण्याचे काम देखील करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Advik Capital Share Price today on 01 September 2023.

हॅशटॅग्स

#Advik Capital Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x