5 November 2024 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC
x

Aeroflex Industries IPO | पैसे तयार ठेवा! एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीजचा IPO येतोय, शेअरची ग्रे मार्केट प्राईस पहा, पहिल्याच दिवशी मालामाल होणार

Aeroflex Industries IPO

Aeroflex Industries IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर, ही बातमी तुमच्या कामाची आहे. लवकरच एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. सेबीने एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीला IPO लाँच करण्याची परवानगी दिली आहे.

एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज ही कंपनी पुढील आठवड्यात 22 ऑगस्ट 2023 रोजी आपला IPO बाजारात लाँच करेल. हा IPO 24 ऑगस्ट 2023 पर्यंत गुंतवणूकीसाठी खुला असेल. एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 102 ते 108 रुपये निश्चित केली आहे.

एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज ही कंपनी आपल्या IPO इश्यूद्वारे 351 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. IPO द्वारे जमा केलेली रक्कम कंपनी आपले कर्ज फेडण्यासाठी खर्च करेल. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी देखील एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 35 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. ग्रे मार्केटमध्ये असूचीबद्ध कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग केली जाते.

एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO इश्यूमध्ये गुंतवणुकदार किमान एक लॉटसाठी बोली लावू शकतात. एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनी आपल्या IPO मध्ये एका लॉटमधून 130 शेअर्स वाटप करणार आहे. एक लॉटमधील 130 शेअर्स खरेदी करण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदाराला 14,040 रुपये जमा करावे लागतील. एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचा स्टॉक BSE आणि NSE या दोन्ही इंडेक्सवर सूचीबद्ध होणार आहे.

या कंपनीचे शेअर्स 1 सप्टेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. बोली लावणाऱ्या गुंतवणूकदारांना 29 ऑगस्ट 2023 रोजी IPO शेअर वाटप केले जातील. Link Intime India Private Limited कंपनीला या IPO चे अधिकृत निबंधक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Aeroflex Industries IPO for investment on 16 August 2023.

हॅशटॅग्स

Aeroflex Industries IPO(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x