15 January 2025 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Air India and Tata Sons | एअर इंडिया विक्रीबाबत अजून निर्णय झालाच नाही - केंद्र सरकार

Air India and Tata Sons

मुंबई, ०१ ऑक्टोबर | आज सकाळपासून एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा समूहाने दाखल (Air India and Tata Sons) केलेलेय निविदेला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची चर्चा होती. मात्र, काहीवेळापूर्वीच केंद्रीय निर्गुंतवणूक मंत्रालयाच्या सचिवांनी ट्विटवरुन असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्प्ष्ट केले. अंतिम निर्णय झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना त्याविषयी माहिती दिली जाईल, असे निर्गुंतवणूक मंत्रालयाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी सांगितले. त्यामुळे एअर इंडियाच्या खासगीकरणाबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे.

The government has denied media reports that Tata Group has won the bid for the debt laden Air India. Bloomberg had reported earlier that salt to software conglomerate would re-acquire the national carrier more than half a century after ceding control to the government. Air India and Tata Sons :

जेआरडी टाटा यांनी 1932 साली टाटा एअरलाईन्स कंपनी स्थापन केली होती. मात्र, काँग्रेस सरकारच्या काळात या कंपनीचे सार्वजनिकीकरण झाले होते. त्यामुळे कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया असे करण्यात आले होते. मात्र, आज 68 वर्षांनंतर ही कंपनी पुन्हा एकदा टाटा समूहाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.

टाटा सन्सबरोबरीनेच, स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे स्पर्धेत होते. टाटा समूहाने एअर इंडियाच्या खरेदीसाठी तब्बल 5000 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले जाते. एअर इंडियासाठी विक्रीसाठी लावण्यात आलेल्या आर्थिक बोलीत 85 टक्के हिस्सा हा कंपनीवरील कर्जदायित्वासाठी, तर 15 टक्के हा रोख रूपात सरकारी तिजोरीत येण्याचे अंदाजण्यात येत आहे. एअर इंडिया टाटा समूहाच्या ताब्यात गेल्यास आता मरगळ आलेल्या भारतीय हवाई सेवा क्षेत्रात चैतन्य संचारण्याची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Air India and Tata Sons deal central government has denied media reports.

हॅशटॅग्स

#AirIndia(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x