18 November 2024 2:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Alok Industries Share Price | रिलायन्सची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा स्वस्त शेअर वेळीच खरेदी करा, मालामाल करणार

Alok Industries Share Price

Alok Industries Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. स्टॉक वाढीचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने व्यवसाय विस्तारासाठी आणि कर्जाची परतफेडीसाठी 7000 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. ( आलोक इंडस्ट्रीज कंपनी अंश )

आलोक इंडस्ट्रीज कंपनीला मुदत कर्ज आणि कार्यरत भांडवल कर्जाच्या रूपात विविध बँकांकडून 3700 कोटी रुपये मिळाले आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने नॉन-कन्व्हर्टेबल क्युम्युलेटिव्ह रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्सच्या रूपात 3300 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. आज गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज स्टॉकमध्ये 3.96 टक्के वाढीसह 30.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ॲक्सिस बँकेने आलोक इंडस्ट्रीज कंपनीला नऊ वर्ष कालावधीसाठी 1,750 कोटी रुपये कर्ज दिले होते. तसेच आलोक इंडस्ट्रीज कंपनीने घेतलेल्या कर्जावर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने कॉर्पोरेट हमी दिली होती. 5 वर्षांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने जेएम फायनान्शियल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीसोबत आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे अधिग्रहण केले होते.

आलोक इंडस्ट्रीज कंपनीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने 1,98,65,33,333 शेअर्स म्हणजेच जवळपास 40.01 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. जेएम फायनान्शियल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने या कंपनीचे 1,73,73,11,844 शेअर्स म्हणजेच 34.99 स्टेक भाग भांडवल धारण केले आहे. अशा प्रकारे त्यांचा एकूण वाटा 75 टक्के आहे.

जानेवारी 2024 मध्ये आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 39.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 101 टक्के नफा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 30 टक्क्यांनी वाढली होती. मात्र मागील एका महिन्यांपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मार्च 2023 मध्ये 10.61 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alok Industries Share Price NSE 07 March 2024.

हॅशटॅग्स

Alok Industries Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x