18 November 2024 3:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Alok Industries Share Price | रिलायन्स संबंधित 30 रुपयाचा स्वस्त शेअर, खरेदीनंतर संयमाने मजबूत परतावा मिळेल

Alok Industries Share Price

Alok Industries Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील सलग दोन ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. गुरुवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 30.58 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 29.13 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश )

नुकताच आलोक इंडस्ट्रीज कंपनीने 7000 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. आलोक इंडस्ट्रीज कंपनीने व्यवसाय विस्तारासाठी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी 7000 कोटी रुपये भांडवल जमा केले आहे. ही भांडवल उभारणी आलोक इंडस्ट्रीज कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीज तसेच ॲक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाकडून केली आहे.

आलोक इंडस्ट्रीज कंपनीला मुदत कर्जाच्या रूपात या बँकांकडून 3700 कोटी रुपये भांडवल देण्यात आले आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने नॉन-कन्व्हर्टेबल क्युम्युलेटिव्ह रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणजेच NCC RPS च्या स्वरूपात 3300 कोटी रुपयेची गुंतवणूक करून आपली भागीदारी वाढवली आहे. आलोक इंडस्ट्रीज कंपनीने घेतलेल्या कर्जाला रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने कॉर्पोरेट हमी दिली आहे.

2020 साली RIL कंपनीने JM Financial Asset Reconstruction सोबत आलोक इंडस्ट्रीज कंपनी ताब्यात घेतली होती. आलोक इंडस्ट्रीजमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने 1,98,65,33,333 शेअर्स म्हणजेच 40.01 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर, JM Financial Asset Reconstruction कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 1,73,73,11,844 शेअर्स म्हणजेच 34.99 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स पुढील काळात 48 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करताना 33 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, जर हा स्टॉक 39 रुपयेच्या पार गेला तर शेअर 48 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alok Industries Share Price NSE Live 09 March 2024.

हॅशटॅग्स

Alok Industries Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x