18 November 2024 3:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Alok Industries Share Price | रिलायन्स संबधित 37 रुपयांचा शेअर वेळीच खरेदी करा, मागील 6 दिवसात 80% परतावा दिला

Alok Industries Share Price

Alok Industries Share Price | शेअर बाजारातील अनेक पेनी स्टॉक्सने 2024 या वर्षाची सुरुवात तेजीसह केली आहे. आलोक इंडस्ट्रीज कंपनीचा पेनी स्टॉक देखील अशाच तेजीत वाढत आहे. 2 जानेवारी 2024 पासून आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 39.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत.

मागील सहा ट्रेडिंग सेशनमध्ये आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ज्ञांच्या मते आलोक इंडस्ट्रीज स्टॉक पुढील काही दिवसात 48 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 0.67 टक्के वाढीसह 37.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीमध्ये 3,300 कोटी रुपयेची गुंतवणूक केली आहे. रिलायन्स कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीमध्ये प्रेफरंस शेअर्स खरेदी करून गुंतवणूक केली आहे. तज्ञांच्या मते आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी तेजी पाहायला मिळू शकते. म्हणून गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये 33 रुपये स्टॉपलॉस लावून 44 रुपये टारगेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, आलोक इंडस्ट्रीज कंपनीचा स्टॉक लवकरच 48 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

2 जानेवारी 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज कंपनी सेबीला कळवले की, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 2020 साली रिलायन्स कंपनीने दिवाळखोरी प्रक्रियेला सामोरे जाणाऱ्या आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे अधिग्रहण केले होते यामधे जेएम फायनान्शियल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीनेही रिलायन्स सोबत भागीदारी केली होती.

त्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्री कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 40.01 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर जेएम फायनान्शियल फर्मने या कंपनीचे 34.99 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alok Industries Share Price NSE Live 10 January 2024.

हॅशटॅग्स

Alok Industries Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x