18 November 2024 8:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Alpex Solar IPO | या IPO शेअरने लॉटरी लागणार! पहिल्याच दिवशी 170 टक्के परतावा मिळू शकतो, GMP पहा

Alpex Solar IPO

Alpex Solar IPO | अल्पेक्स सोलर कंपनीचा IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा IPO 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. अल्पेक्स सोलर कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची प्राइस बँड 109 रुपये ते 115 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.

अल्पेक्स सोलर कंपनीने बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी अँकर गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्याची संधी दिली होती. या कंपनीच्या IPO चा आकार 74.52 कोटी रुपये आहे. अल्पेक्स सोलर कंपनीने आपल्या IPO मध्ये बुक बिल्डिंग मार्गाद्वारे 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 64.80 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे.

अल्पेक्स सोलर कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 1,200 इक्विटी शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 138,000 रुपये जमा करावे लागणार आहेत. कंपनीने या IPO मध्ये अँकर गुंतवणूकदारांसाठी 18.45 लाख इक्विटी शेअर्स राखीव ठेवले आहेत. तर 3.24 लाख इक्विटी शेअर्स मार्केट मेकर्ससाठी राखीव असतील. 9.24 लाख इक्विटी शेअर्स गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि 12.31 लाख शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. अल्पेक्स सोलर कंपनीने आपल्या IPO मध्ये 21.55 लाख इक्विटी शेअर्स RII साठी राखीव ठेवले आहेत.

अल्पेक्स सोलर कंपनी 13 फेब्रुवारी रोजी गुंतवणुकदारांना स्टॉक वाटप करेल. आणि 15 फेब्रुवारी रोजी या कंपनीचे शेअर्स NSE इमर्ज इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील. कॉर्पोरेट कॅपिटल व्हेंचर्स कंपनीला अल्पेक्स सोलर IPO साठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आणि Skyline Financial Services Pvt Ltd कंपनीला IPO रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

ग्रे मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते, अल्पेक्स सोलर कंपनीचे आयपीओ शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 195 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स 310 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. ज्या गुंतवणुकदारांना हा IPO स्टॉक वाटप केला जाईल, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 170 टक्के नफा मिळू शकतो.

अल्पेक्स सोलर कंपनी आपल्या IPO मधून जमा होणाऱ्या रकमेतून 19.55 कोटी रुपये कंपनीचे सोलर मॉड्यूल उत्पादन सुविधा अपग्रेड आणि विस्तार करण्यासाठी, आणि या सोलर मॉड्यूल उत्पादन सुविधाची क्षमता 450 MW वरून 1.2 GW पर्यंत वाढवण्यासाठी खर्च करणार आहे. याव्यतिरिक्त कंपनी 12.94 कोटी रुपये सौर मॉड्यूल्सच्या ॲल्युमिनियम फ्रेम बनवण्याकरता नवीन उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी खर्च करणार आहे. तर उर्वरित 20.49 कोटी रुपये कंपनी आपल्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alpex Solar IPO for investment 08 February 2024.

हॅशटॅग्स

Alpex Solar IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x