
Alpex Solar Share Price | अल्पेक्स सोलर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.8 टक्के वाढीसह 390.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. नुकताच अल्पेक्स सोलर या सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने जाहीर केले की त्यांना झारखंड रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीने 500 सोलर वॉटर पंपिंग सिस्टीमचा पुरवठा करण्याची आणि ते कार्यान्वित करण्याची ऑर्डर दिली आहे. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी अल्पेक्स सोलर स्टॉक 1.86 टक्के घसरणीसह 366.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( अल्पेक्स सोलर कंपनी अंश )
अल्पेक्स सोलर कंपनीला प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान योजना म्हणजेच पीएम-कुसुम योजने अंतर्गत ही ऑर्डर देण्यात आली आहेत. अल्पेक्स सोलर कंपनीला मागील काही महिन्यांपासून सतत मोठ्या ऑर्डर्स मिळत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला देखील कंपनीला पीएम-कुसुम योजनेअंतर्गत हरियाणामध्ये 43.70 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स मिळाल्या होत्या. या कंपनीला राजस्थानमध्ये देखील सौर जलपंप बसवण्याची ऑर्डर मिळाली आहे.
अल्पेक्स सोलर कंपनी मुख्यतः मोनोक्रिस्टलाइन आणि पॉलीक्रिस्टलाइन सेल तंत्रज्ञानाचा वापर करून पीव्ही मॉड्यूल बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी बायफेशियल, मोनो-पर्क आणि हाफकट सोलर पीव्ही मॉड्यूल्स देखील बनवते. या कंपनीचा IPO 115 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. कंपनीने आपल्या शेअर्सची किंमत बँड 109 ते 115 रुपये निश्चित केली होती. आणि स्टॉक 329 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. म्हणजेच कंपनीच्या गुंतवणुकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी 186.09 टक्के नफा मिळाला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.




























