29 June 2024 10:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 30 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 30 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Standard Capital Share Price | शेअर प्राईस 1 रुपये 58 पैसे! चिल्लर गुंतवणूक करा, 6 महिन्यात दिला 490% परतावा BEL Share Price | संधी सोडू नका! PSU स्टॉक फायद्याचा ठरणार, शॉर्ट टर्ममध्ये होईल मोठी कमाई Yes Bank Share Price | येस बँक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | शेअर प्राईस 1 रुपया 11 पैसे! हे 10 पेनी शेअर्स मालामाल करणार, रोज अप्पर सर्किट हिट Vodafone Idea Share Price | कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअरवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा?
x

Amara Raja Batteries Share Price | सुसाट तेजी! 2 दिवसात 23% परतावा दिला, स्टॉक प्राईस 2100 रुपयांना स्पर्श करणार

Amara Raja Batteries Share Price

Amara Raja Batteries Share Price | अमारा राजा बॅटरी कंपनीचे शेअर्स 25 जून रोजी 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी अमारा राजा अॅडव्हान्स्ड सेल टेक्नॉलॉजी कंपनीने लिथियम- आयन बॅटरीच्या तंत्रज्ञानासाठी GIB EnergyX Slovakia कंपनीसोबत करार केला आहे. GIB EnergyX Slovakia ही कंपनी Gotion High-Tech या चीनी कंपनीची उपकंपनी आहे. ( अमारा राजा बॅटरी कंपनी अंश )

या करारांतर्गत अमारा राजा एनर्जी कंपनी GIB EnergyX कडून लिथियम-आयन बॅटरीसाठी जागतिक दर्जाच्या लिथियम आयर्न फॉस्फेट तंत्रज्ञानाचा परवाना घेणार आहे. या कराराच्या घोषणेनंतर अमारा राजा बॅटरी स्टॉक तेजीत आला होता.

आज बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी अमारा राजा बॅटरी स्टॉक 2.85 टक्के वाढीसह 1,693.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील पाच दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहे. आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. 2024 या वर्षात अमारा राजा बॅटरी कंपनीच्या शेअरची किंमत दुप्पट झाली आहे. 2014 नंतर या स्टॉकने साध्य केलेली ही सर्वात मोठी वाढ आहे.

2014 या एका वर्षात अमारा राजा बॅटरी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 144 टक्के परतावा कमावून दिला आहे. या करारानंतर अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी अमारा राजा बॅटरी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. JPMorgan फर्मच्या तज्ञांच्या मते, अमारा राजा बॅटरी स्टॉक 2,100 रुपये किमतीवर जाऊ शकतो. नवीन भागीदारीमुळे अमारा राजा बॅटरी कंपनीच्या गीगा फॅक्टरीमधील कामाचा वेग वाढेल. यासह कंपनीच्या 16 गिगावॅट क्षमतेचे लक्ष्य गाठण्याच्या क्षमतेबद्दल गुंतवणूकदारांमध्ये अधिक आत्मविश्वास निर्माण होईल.

मागील वर्षी अमारा राजा बॅटरी कंपनीने तेलंगणामध्ये 9,500 कोटी रुपये मूल्याच्या गुंतवणुकीसह गिगाफॅक्टरी उभारण्याची घोषणा केली होती. यासह कंपनीने युरोपियन बॅटरी टेक कंपनी नोबॅटमध्ये हिस्सा वाढवण्यासाठी 20 दशलक्ष युरो गुंतवणूक केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अमारा राजा बॅटरी कंपनीचे शेअर्स 19.56 टक्के वाढीसह 1,650 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Amara Raja Batteries Share Price NSE Live 26 June 2024.

हॅशटॅग्स

Amara Raja Batteries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x