Amazon India Scam | लीगल फीसच्या नावावर ८,५४६ कोटी खर्च | नियम बदलण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा संशय
नवी दिल्ली, २२ सप्टेंबर | विदेशी ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने भारतात लीगल फीसच्या नावावर ८,५४६ कोटी रुपये खर्च दाखवल्याचा पर्दाफाश झाल्यानंतर कंपनी गोत्यात आली आहे. विधी तज्ज्ञांनुसार, भारतात इतकी फी केवळ अशक्य आहे. कदाचित या रकमेचा वापर लाच देण्यासाठी, मनी लाँड्रिंगमध्ये करचोरीसाठी केला गेला आहे. दरम्यान, छोट्या व्यावसायिकांची संघटना कॅटनेही अमेझॉनने ई-कॉमर्सचे नियम बदलावेत म्हणून अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी या रकमेचा वापर केल्याचे म्हटले आहे.
Amazon Scam, लीगल फीसच्या नावावर ८,५४६ कोटी खर्च, नियम बदलण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा संशय – Amazon India made fraud 8546 crore legal fees to bribe Indian government officers :
लीगल फीसचा नावाखाली घोटाळा आणि लाच:
सायबर कायद्याचे जाणकार व सुप्रीम कोर्टातील वकील विराग गुप्ता यांच्यानुसार, देशात कायदा मंत्रालयाचे बजेट २,६४५ कोटी आहे. यामध्ये ११०० कोटींचा खर्च आहे. यात १,५४५ कोटी रुपये शिल्लक राहतात. तर, अमेझॉन लीगल फीसचा खर्च ८,५४६ कोटी सांगत आहे. हा प्रकार आश्चर्यकारक आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे तज्ज्ञ वकील म्हणतात, देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचाही कायदेशीर बाबींसाठीचा खर्च एवढा प्रचंड नाही. शिवाय, अमेझॉनवर अशा प्रकरणांत खटलेही फार कमी आहेत. म्हणजेच हा पैसा इतर कोणत्या कामासाठी खर्च होत होता. अमेझॉनचे दोन वर्षांतील उत्पन्न ४२,०८५ कोटी रुपये आहे. तर, त्यातील ८,५४६ कोटी लीगल फीसाठी दिल्याचे ही कंपनी सांगते. दरम्यान, यात भ्रष्टाचार झाला असेल तर अमेझॉनची कायदेशीर चौकशी केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. वाणिज्य मंत्रालयातील सूत्रांनुसार, या प्रकरणात न्यायालयीन चौकशी होऊ शकते.
Amazon India spent rupees 8546 crore in legal expenses during 2018-20 :
सरकारी अधिकारीही सहभागी, सीबीआयद्वारे चौकशी करावी:
लहान व्यावसायिकांची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (सीएआयटी) राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया म्हणाले की, अमेझॉन व तिच्या सहायक कंपन्या भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी आणि नियमांत हेरफार करण्यासाठी आर्थिक ताकदीचा दुरुपयोग करत आहेत, हे या रकमेवरून दिसते. सीएआयटीने केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, लाचखोरीचे प्रकरण गंभीर आहे. त्यात अमेझॉनसोबतच सरकारी अधिकारीही सहभागी आहेत. त्यामुळे या घोटाळ्याची तत्काळ सीबीआयद्वारे चौकशी व्हावी.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: Amazon India made fraud 8546 crore legal fees to bribe Indian government officers.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER