20 April 2025 12:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

APL Apollo Share Price | संयम राखला त्यांना कुबेर पावला! 10 वर्षात APL अपोलो शेअरने 88,000 रुपयांवर दिला कोटीत परतावा, खरेदीचा सल्ला

APL Apollo Share Price

APL Apollo Share Price | एपीएल अपोलो ट्यूब्स या स्ट्रक्चरल स्टील ट्यूब बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने दोन दिवसांपूर्वी आपली विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आणि या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. मागील 10 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने 82 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे आणि मागील आठवड्यात शेअर आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर पोहचला होता.

आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शेअरखान फर्मच्या तज्ञाच्या मते, या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपासून 17 टक्के अधिक वाढू शकतात. आज सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी एपीएल अपोलो ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 0.89 टक्के वाढीसह 1,731.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

13 सप्टेंबर 2013 रोजी एपीएल अपोलो ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या कंपनीचे शेअर्स 11334 टक्क्यांनी वाढून 1731 रुपये किमतीवर पोहचले आहेत. म्हणजेच ज्या लोकांनी 10 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 88 हजार रुपये लावले होते, ते लोक आता करोडपती झाले आहे. गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 990 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या 10 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 82 टक्क्यांनी वाढून 1806.20 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

एपीएल अपोलो ट्यूब्स ही भारतातील सर्वात मोठी स्ट्रक्चरल स्टील ट्यूबिंग कंपनी म्हणून ओळखली जाते. स्ट्रक्चरल स्टील ट्यूबिंगचा वापर सरकारी प्रकल्प, पायाभूत सुविधा, आणि रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जात आहे. आर्थिक वर्ष 2030 पर्यंत तो स्ट्रक्चरल स्टील ट्यूबिंगचा वापर 16 मेट्रिक टनांनी वाढू शकतो.

भारताच्या पोलाद वापरात स्ट्रक्चरल स्टील ट्यूबिंगचा वाटा एकूण 6 टक्क्यांवरून 8 टक्क्यांपर्यंत वाढेल. सध्या कंपनीच्या फोकस आर्थिक वर्ष 2025 पर्यंत स्ट्रक्चरल स्टील ट्यूबिंगचा वापर 5 MT आणि आर्थिक वर्ष 2030 पर्यंत 10MT पर्यंत नेण्यावर आहे. याचा अर्थ स्ट्रक्चरल स्टील ट्यूब्सच्या वाढत्या मागणीच्या संधींचा फायदा घेण्यासाठी ही सर्वोत्तम स्थिती आहे.

ब्रोकरेज फर्म शेअरखानच्या तज्ञांनी अंदाज व्यक्त केलं आहे की, 2023-26 या आर्थिक वर्षात स्ट्रक्चरल स्टील ट्यूबिंगचे प्रमाण 27 टक्के सीएजीआरने वाढेल. ब्रोकरेज फर्मचा आहे की कंपनीचे मूल्यवर्धित उत्पादने सध्याच्या 57 टक्के वाढून 2025 मध्ये 70 टक्क्यांवर जाऊ शकते. एपीएल अपोलो ट्यूब्स कंपनीच्या मूल्यवर्धित उत्पादनांचे मार्जिन 6000-8000 रुपये प्रति टन इतके आहे. तर एपीएलचे सध्याचे मार्जिन 4500 रुपये प्रति टन आहे.

अशा परिस्थितीत कंपनीचा EBITDA मार्जिन आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 34 टक्क्यांच्या वाढीसह 6017 रुपये प्रति टन नोंदवला जाऊ शकतो. 2023-26 या आर्थिक वर्षात कंपनीच्या निव्वळ नफ्यात 45 टक्के CAGR वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून दिग्गज ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर 2000 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | APL Apollo Share Price today on 11 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

APL Apollo Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या