Apollo Hospitals Share Price | हॉस्पिटल क्षेत्रातील कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदार करोडपती झाले, स्टॉक तेजीत, टार्गेट प्राईस पाहा

Apollo Hospitals Share Price | ‘अपोलो हॉस्पिटल्स’ या हॉस्पिटल क्षेत्रातील कंपनीने अल्पावधीत जबरदस्त कामगिरी केली आहे. 2023 या वर्षात कंपनीचे शेअर्स एक टक्क्यांनी घसरले आहेत, मात्र स्टॉकने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते या स्टॉकमध्ये कमाई करण्याची मोठी संधी आली आहे. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास हा 30 टक्के जास्त नफा मिळवून देऊ शकतो. सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी अपोलो हॉस्पिटल्स कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के वाढीसह 4,415.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Apollo Hospitals Enterprise Share Price | Apollo Hospitals Enterprise Stock Price | BSE 508869 | NSE APOLLOHOSP)
डिसेंबर 2022 च्या तिमाहीत मजबूत फार्मसी व्यवसायामुळे ‘अपोलो हॉस्पिटल्स’ कंपनीचा महसूल वार्षिक 17.2 टक्क्यांच्या वाढीसह 4,260 कोटी रुपयेवर पोहचला आहे. कंपनीने आपल्या Apollo 24X7 कंपनीवर जास्त खर्च केल्यामुळे कंपनीचा EBITDA मार्जिन तिमाही आधारावर 1.40 टक्क्यांनी घसरला आहे. ब्रोकरेज फर्म या स्टॉकबाबत खूप सकारात्मक आहेत कारण, कंपनी आपल्या उद्योग क्षेत्रात सतत विस्तारत करत आहे. आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये कंपनीने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवली आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने स्टॉकचे ‘bay’ रेटिंग कायम ठेवले आहे. मजबूत ब्रँड म्हणून संपूर्ण भारतातील रुग्णालयातील उपस्थिती तसेच फार्मसी, डॉक्टर सल्ला, क्लिनिक आणि डायग्नोस्टिक्सचे डिजिटल नेटवर्क तयार करण्यावर कंपनीने जास्त भर दिला आहे. म्हणून तज्ञांनी स्टॉकवर 5,073 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. दिग्गज ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने ही या कंपनीच्या स्टॉकबर बाय रेटिंग देऊन 5,700 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
मल्टीबॅगर परतावा :
9 नोव्हेंबर 2001 रोजी ‘अपोलो हॉस्पिटल’ कंपनीचे शेअर्स 36.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज हा स्टॉक 4415.35 रुपयांवर पोहचला आहे. मागील 21 वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 83 हजार रुपयांवर एक कोटी परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी 14 मार्च 2022 रोजी ‘अपोलो हॉस्पिटल’ कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 5015.45 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. 26 मे 2022 रोजी ते स्टॉकमध्ये 33 टक्क्यांची घसरण झाली आणि शेअरची किंमत 3365.90 रुपये या वार्षिक नीचांक किमतीवर आली. आतापर्यंत स्टॉक नीचांक किंमत पातळीपासून 31 टक्के वर आला आहे. आणि पुढील काळात यामध्ये 30 टक्के आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Apollo Hospitals Enterprise Share Price 508869 APOLLOHOSP today on 06 march 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC