19 April 2025 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

Apollo Micro Share Price | मॅजिक शेअर! मागील 1 महिन्यात 33% परतावा, तर 2 वर्षांत 537% परतावा दिला, खरेदी करणार?

Apollo Micro Share Price

Apollo Micro Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह 76.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील एका महिन्यात अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे. अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पर्की किंमत 20.70 रुपये होती. बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी अपोलो मायक्रो सिस्टीम्स स्टॉक 9.83 टक्के वाढीसह 73.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील 2 वर्षात अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहे. 17 डिसेंबर 2021 रोजी अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 11.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 18 ऑक्टोबर 2023 रोजी अपोलो मायक्रो सिस्टीम स्टॉक 76.45 रुपये किमतीवर पोहचला होता.

अवघ्या दोन वर्षांत अपोलो मायक्रो सिस्टीम स्टॉकची किंमत 537 टक्के वाढली आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 219 टक्के परतावा कमावून दिला आहे. 19 ऑक्टोबर 2022 रोजी अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 22.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 76 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.

अपोलो मायक्रो सिस्टीम्स ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रॉनिक उत्पादन, हार्डवेअर डिझायनिंग, शस्त्रे एकत्रीकरण आणि प्लॅटफॉर्म एकत्रीकरण क्षेत्रात व्यवसाय करते. नुकताच हा कंपनीने संरक्षण उपकरणे निर्मिती प्रकल्प स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी हैदराबाद शहरात हार्डवेअर पार्कमध्ये संरक्षण उपकरणे निर्मिती प्लांट उभारण्याची योजना आखत आहे. या नवीन प्लांटसाठी अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीने 150 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या प्लांटचे बांधकाम पुढील 9 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीने संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी अपोलो डिफेन्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच एपीडीआयपीएल या स्वतंत्र कंपनीची स्थापन केली आहे. अपोलो डिफेन्स इंडस्ट्रीज कंपनी संरक्षण, एरोस्पेस आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Apollo Micro Share Price NSE 19 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Apollo Micro Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या