20 January 2025 7:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO 8th Pay Commission | सरकारी क्लार्क पासून मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत इतका पगार आणि पेन्शन वाढणार, ग्रेड प्रमाणे रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 94 पैशाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, सतत अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 511700
x

Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO

Apollo Micro Systems Share Price

Apollo Micro Systems Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्समध्ये ४५४ अंकांनी वाढ पाहायला मिळाली.तर निफ्टी २३,३५० वर पोहोचला होता. सोमवारी स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तीन लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बीएसई सेन्सेक्स ४५४.११ अंकांच्या तेजीसह ७७,०७३.४४ वर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी १४१.५५ अंकांच्या तेजीसह २३,३४४.७५ वर बंद झाला होता. दरम्यान, या तेजीत ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड या डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.

अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअरची सध्याची स्थिती

सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनी शेअर 13.56 टक्क्यांनी वाढून 149.20 रुपयांवर पोहोचला होता. अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 155.44 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 87.99 रुपये होती. अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 4,628 कोटी रुपये आहे.

ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर टार्गेट प्राईस

आज दिवसभरात अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअरने 155.44 रुपयांचा उच्चांक गाठला होता. ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनी शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनी शेअर्स १२९ ते १२६ रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

तसेच शेअर या पातळीपेक्षा खाली आल्यास ११६ रुपयांचा स्टॉपलॉस कायम ठेवावा असं ब्रोकरेजने म्हटलं आहे. ब्रोकरेजने या शेअरसाठी १५० रुपये ही पहिली टार्गेट प्राईस आणि १५६ रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Apollo Micro Systems Share Price Monday 20 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Apollo Micro Systems Share Price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x