26 April 2025 3:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | आयआरबी शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, 46 रुपयांच्या शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRB
x

Apollo Micro Systems Share Price | मार्ग श्रीमंतीचा! स्वस्त शेअर अपोलो मायक्रो सिस्टीमने 2 दिवसात 18% परतावा दिला, वेळीच फायद्या घ्या

Apollo Micro Systems Share Price

Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम या संरक्षण क्षेत्रात उद्योग कर्णस्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 65.37 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे.

अपोलो मायक्रो सिस्टीम या डिफेन्स कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका घोषणेनंतर पाहायला मिळाली आहे. संरक्षण संबंधित उत्पादन करणारी अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनी हैदराबादमधील हार्डवेअर पार्कमध्ये एक उत्पादन कारखाना सुरू करणार आहे. या बातमीमुळे कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. आज गुरूवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी अपोलो मायक्रो सिस्टीम स्टॉक 9.98 टक्के वाढीसह 71.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीने हैदराबादस्थित नवीन प्लांटमध्ये 150 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये कळवले आहे की, या नवीन प्लांटचे भूमिपूजन आयोजित करण्यात आले आहे. आणि कंपनी हा कारखाना पुढील 9 महिन्यांत सुरू करण्याच्या प्रयत्न करत आहे.

अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनी आपल्या नवीन उत्पादन प्रकल्पात 150 कोटी रुपये गुंतवणूक देखील करणार आहे. या नवीन प्लांटचे क्षेत्रफळ सुमारे 3 लाख स्क्वेअर फूट आहे. आणि अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीने अपोलो डिफेन्स इंडस्ट्रीज या नावाने एक उपकंपनी देखील स्थापन केली आहे. ही कंपनी संरक्षण उपाय प्रदान करण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत युती आणि तंत्रज्ञान भागीदारी करून कंपनीला सहाय्य करेल.

मागील 6 महिन्यांत अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 123 टक्के परतावा कमावून दिला आहे. 5 एप्रिल 2023 रोजी अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीचे शेअर्स 29.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 4 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 65.37 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2023 या वर्षात अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीचे शेअर्स 113 टक्के मजबूत झाले आहेत.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 257 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील साडेतीन वर्षांत अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1369 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी अपोलो मायक्रो सिस्टीम स्टॉक 4.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, जो आता 65.37 रुपये किमतीवर पोहचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Apollo Micro Systems Share Price today on 05 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Apollo Micro Systems Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony