22 November 2024 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Ashneer Grover | महिला उद्योजकाने घागरा घातला होता | अश्नीर म्हणाला, मी घागऱ्यात असतो तर हा निर्णय घेतला असता

Ashneer Grover

मुंबई, 04 एप्रिल | जेव्हा मथुरा येथील मालविका सक्सेना शार्क टँक इंडियाला पोहोचली आणि तिच्या व्यवसायाबद्दल सांगितले तेव्हा सर्व जजेस तिच्यावर खूप प्रभावित झाले. कारण एका छोट्या शहरात राहून मालविका तिची (Ashneer Grover) स्वप्ने साकार करत आहे.

Malvika told in Shark Tank India that in the year 2018, she started this business from her home. The name of his company is ‘The Quirky Naari :

नवोदित उद्योजिका मालविकाने शार्क टँक इंडियामध्ये सांगितले की, 2018 साली तिने घरातून हा व्यवसाय सुरू केला. ‘द क्विर्की नारी’ असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे. हे नाव फायनल करायला दोन दिवस लागले असे त्यांनी सांगितले. या नावात पारंपरिक संस्कृतीचीही काळजी घेण्यात आली आहे.

मालविकाच्या व्यवसायाने जजेस प्रभावित:
मालविका शूज आणि कपड्यांवर विविध प्रकारचे कस्टमायझेशन करते आणि त्यांना वेगळा लुक देते. जजेसना सुद्धा तिच्या कंपनीचे कस्टमाइज्ड शूज खूप आवडले. एवढेच नाही तर त्यांनी विनिता सिंगला एक कस्टमाइज्ड शू भेट दिला. ते परिधान करून तिला खूप आनंद झाला.

जजेसकडे ३५ लाख रुपयांची मागणी :
मालविकाने शार्क जजेसकडे ५ टक्के इक्विटीच्या बदल्यात ३५ लाख रुपयांची मागणी केली. विनिता सिंग आणि अनुपम मित्तल यांनी या कंपनीत गुंतवणूक करण्याचे मान्य केले.

अश्नीर ग्रोव्हरची टिपणी :
दरम्यान, विनिता आणि अनुपम दोघेही तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, असे अश्नीर ग्रोव्हरने सांगितले. विनिता व्यवसाय वाढवण्यास फायद्याची ठरेल. मात्र अनुपम मित्तल मोठा गेल खेळत आहे. त्यामुळे तुझ्या ऐवजी मी जर या घागरात उभी राहिलो असतो तर मी या डिलसाठी विनीतासोबत गेलो असतो.

जजेसमधील मजेदार वादविवाद :
त्यानंतर अमन गुप्ता यांनी ‘तुम्ही अनुपमला जाऊ द्या आणि विनिताला सोबत घेऊन जा’, असा टोला लगावला. त्यानंतर अनुपम मित्तल यांनी उत्तर दिले की, ‘मालविकाचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. काही लोक काम बिघडवणारे असतात. त्यांचे काम फक्त काम बिघडवणे आहे. या सगळ्याच्या फंदात पडू नका.

काही लोक काम बिघडवतात :
अनुपम मित्तल पुढे म्हणाले की, ‘आम्हाला काम कसे करायचे हे माहित आहे. काही लोक बाजूला बसून काम बिघडवतात. फसव्या गोष्टी बोलतात. ही कामे बिघडवणारी आहेत. तुम्ही पान दुकान पाहिलं असेल, तिथे काही लोक बसून काय करतात, तेच काम हे लोक करत आहेत. शोमध्ये हे सर्व मजेशीर पद्धतीने केले जात असले तरी. अखेरीस मथुरा येथील मालविकाने अनुपम आणि विनिता यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी 35 लाख रुपयांमध्ये 24 टक्के इक्विटी देण्याचे मान्य केले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ashneer Grover Shark Tank India Mathura based woman entrepreneur The Quirky Naari 04 April 2022.

हॅशटॅग्स

#Ashneer Grover(8)#Tha Shark Tank(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x