22 November 2024 1:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने कमाई होणार - NSE: ASHOKLEY

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. अवजड वाहन उत्पादनात प्रसिद्ध असलेल्या अशोक लेलँड लिमिटेड (NSE: ASHOKLEY) कंपनीला ५०० इलेक्ट्रिक बसेसचा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला हे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, ‘अशोक लेलँड लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेल्या OHM ग्लोबल मोबिलिटी कंपनीला चेन्नईच्या मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनकडून 500 12 मीटर अल्ट्रा-लो फ्लोर इलेक्ट्रिक बसचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. तसेच, अशोक लेलँड लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेली स्विच मोबिलिटी कंपनी ओएचएम’ला ईआयव्ही 12 मॉडेल बस पुरवेल. (अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश)

गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.41 टक्के वाढून 217.13 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.07 टक्के घसरून 214.94 रुपयांवर पोहोचला होता.

या आधीच कॉन्ट्रॅक्ट
काही दिवसांपूर्वी हिंदुजा ग्रुपची कंपनी असलेल्या अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने चेन्नईस्थित बिलियन इलेक्ट्रिक मोबिलिटी या कंपनीला इलेक्ट्रिक ट्रकची डिलिव्हरी सुरू केली आहे. चेन्नई-बेंगळुरू, चेन्नई-विजयवाडा मार्गावर धावणाऱ्या ग्रुप बिलियानीला अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने १८० इलेक्ट्रिक ट्रक पुरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट केला होता. त्यामुळे अशोक लेलँड लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली आहे.

प्रवाशी क्षमता वाढणार
अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन चेन्नईच्या ५०० इलेक्ट्रिक बसेसच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ४०० बसेस नॉन एसी असतील, तर १०० बस एसी असतील. या बसच्या क्षमतेनुसार एकाच वेळी ३७ प्रवासी प्रवास करू शकतील, तसेच २४ प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतील, अशी माहिती अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने दिली आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने पुढे म्हटलं आहे की, ‘स्विच EIV 12 मजबूत 650 व्ही इलेक्ट्रिक आर्किटेक्चरद्वारे संचालित आहे आणि त्यात आयपी 67-रेटेड बॅटरी आहे, जी अधिक स्थिरता आणि सुरक्षितता सुनिश्चित करते आणि त्यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर होईल.

एका चार्जमध्ये 200 KM प्रवास
अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘या बस एका चार्जवर 200 किलोमीटरचा प्रवास अखंडपणे करू शकतील. त्यामुळे चेन्नईच्या मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या खर्चातही मोठी बचत होईल. तसेच सर्वप्रथम, पेरुंबूर, पेरुंबकम, पूनमल्ले, व्यासपंडी, केके नगर आणि थोंडियापेट सह ६ प्रमुख डेपोंमध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर विकसित केले जाईल असं कंपनीने म्हटले आहे.

शेअरने किती परतावा दिला
अशोक लेलँड कंपनी शेअरने मागील ६ महिन्यात 22.52% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 28.37% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 191.29% परतावा दिला आहे. तर YTD आधारावर या शेअरने 17.02% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 9527% परतावा मिळाला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Ashok Leyland Share Price 25 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x