18 November 2024 3:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीला मिळाला सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्ट, शेअर्स तेजीच्या संकेताने खरेदी वाढली

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड लिमिटेड कंपनीला गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 1,282 बस पुरवठा करण्याची एक मोठी ऑर्डर दिली आहे. हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने शुक्रवारी माहिती दिली आहे की, नवीन ऑर्डरच्या अटींनुसार, अशोक लेलँड कंपनी 55 आसनी पूर्ण सुसज्ज BS-VI डिझेल बसेसचा पुरवठा गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाला करणार आहे. शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.81 टक्के वाढीसह 177.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीचे स्पष्टीकरण :
अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात राज्य परिवहन उपक्रमाद्वारे एका कंपनीला देण्यात आलेले हे सर्वात मोठे कॉन्ट्रॅक्ट आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने म्हंटले आहे की, कंपनीला गुजरात स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनकडून एवढे मोठे कंत्राट मिळाल्याने कंपनीमध्ये एक नवीन उत्साह संचारला आहे. GSRTC दीर्घ काळापासून अशोक लेलँड कंपनीशी व्यावसायिकरित्या संबंधित आहे. कंपनीकडे BS-VI प्रमाणपत्र आहे.

शेअरची कामगिरी :
अशोक लेलँड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, GSRTC कडून हे कंत्राट मिळाल्याने त्यांना कंपनीला खूप फायदा होणार आहे. नवीन ऑर्डरची बातमी येताच अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 1.81 टक्के वाढीसह 177.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.62 टक्के कमजोर झाले आहेत.

मागील सहा महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 27.33 टक्के मजबूत झाले आहेत. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 19.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना आजपर्यंत कमाल 7,742.92 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत शेअर्सची किंमत 2 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price 30 September 2023.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x