23 December 2024 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस
x

Ashok Leyland Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 11296% परतावा दिला, आता नवी टार्गेट प्राईस तपासा

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | 2023 या नवीन वर्षात व्यावसायिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘अशोक लेलैंड’ चे शेअर्स 3 टक्क्यांपेक्षा जास्त मजबूत झाले आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. मात्र शेअर बाजारातील तज्ञ स्टॉक बाबत निराश पाहायला मिळत आहे. डिसेंबर 2022 या तिमाहीचे निकाल मजबूत असूनही ब्रोकरेज फर्म HDFC सिक्युरिटीजने ‘अशोक लेलँड’ कंपनीच्या शेअरवर 116 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्म HDFC सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. कारण शेअरची किंमत सध्याच्या किंमतीपेक्षा 25 टक्क्यांनी खाली जाऊ शकते. सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी ‘अशोक लेलैंड’ कंपनीचे शेअर 0.75 टक्के घसरणीसह 152.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Ashok Leyland Share Price | Ashok Leyland Stock Price | BSE 500477 | NSE ASHOKLEY)

निराशाजनक रेटिंग :
‘अशोक लेलैंड’ कंपनीने डिसेंबर 2022 च्या तिमाहीत 360 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा कंपनीने खूप चांगली कामगिरी केली आहे. कंपनीच्या मार्जिनमध्ये देखील तिमाही आधारावर 2.30 टक्क्यांची वाढ झाली असून मार्जिन 8.8 टक्क्यांवर गेला आहे. 2022-23 या चालू आर्थिक वर्षात एप्रिल-डिसेंबर या पहिल्या नऊ महिन्यांत ‘अशोक लेलँड’ कंपनीने मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहन विभागात जबरदस्त कामगिरी केली होती. आणि त्याचा बाजार हिस्सा 7.70 टक्क्यांनी वाढून 32.1 टक्केवर पोहचला आहे.

तथापि कंपनीचा मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहने, पॅसेंजर विभागामध्ये योगदान 8.20 टक्क्यांनी घसरून 28.6 टक्क्यांवर आले आहे. याशिवाय लो कमर्शियल व्हेईकल वस्तूंमध्येही कंपनीचा बाजारातील हिस्सा घटल्याची माहिती कंपनीने तिमाही निकालात दिली आहे. मालवाहतुकीमध्ये रेल्वेचा वाटा वाढविण्यासाठी सरकार जोरदार प्रयत्न कर आहे. सध्या मालवाहतुकीत रेल्वेचा वाटा 29 टक्के असून 2030 पर्यंत तो 40-45 टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट सरकारने निर्धारित केले आहे, जो व्यावसायिक वाहन क्षेत्रासाठी नकारात्मक ठरू शकतो. म्हणून ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअरसाठी 116 रुपये लक्ष्य किंमत देऊन स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग कायम ठेवले आहे.

मल्टीबॅगर परतावा :
28 ऑगस्ट 1998 रोजी ‘अशोक लेलैंड’ कंपनीचे शेअर्स फक्त 1.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता स्टॉकमध्ये अद्भूत वाढ झाली असून शेअरची किंमत 11296 टक्के वाढीसह 152.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजे त्यावेळी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 25 वर्षात 114 पट वाढून 1.14 कोटी रुपये झाले आहे. या कंपनीच्या शेअरने केवळ दीर्घ मुदतीत चांगला परतावा दिला असे नाही, तर अल्पावधीत ही बक्कळ कमाई करून दिली आहे. मागील वर्षी 8 मार्च 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 93.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या सहा महिन्यांत म्हणजेच 6 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 82 टक्क्यांच्या वाढीसह 169.40 रुपये या आपल्या विक्रमी किंमतीवर पोहचली होती. मात्र शेअर्समधे ही तेजी टिकू शकली नाही, आणि शेअर सध्या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीपासून 9 टक्के कमी किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price 500477 ASHOKLEY stock market live on 06 February 2023.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(69)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x