15 January 2025 5:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉक तेजीत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, गुंतवणूक करून फायदा घ्या

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉक शुक्रवारी अफाट तेजीत धावत होता. दिवसभराच्या व्यवहारात हा स्टॉक 7 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. दिवसाअखेर शेअर किंचित खाली आला आणि हिरव्या निशाणीवर क्लोज झाला होता. अशोक लेलँड कंपनीने गुरुवारी आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. त्यानंतर शुक्रवारी शेअरमध्ये तेजी निर्माण झाली. ब्रोकरेज फर्म यूबीएसने अशोक लेलँड स्टॉकची रेटिंग अपग्रेड केली आहे. तज्ञांनी अशोक लेलँड स्टॉकची रेटिंग ‘न्यूट्रल’ वरून ‘बाय’ केली आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )

शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 235 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आणि काही वेळात हा स्टॉक 7 टक्क्यांच्या वाढीसह 248.80 रुपये किमतीवर पोहचला होता. शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 6.05 टक्के वाढीसह 246.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

जून तिमाही निकलात कंपनीने माहिती दिली की, कंपनीच्या मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांच्या संख्येत 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशोक लेलँड कंपनीने वाहन बाजाराचा 30.70 टक्के वाटा काबीज केला आहे. संपूर्ण बस मार्केटमध्ये या कंपनीने 33.30 टक्के वाटा काबीज केला आहे.

अशोक लेलँड कंपनीचा EBITDA जून तिमाहीत 11 टक्के वाढला आहे. जून तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात एकूण 16 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. हे प्रमाण जेफरीज फर्मच्या तज्ञांच्या अंदाजापेक्षा 3 टक्के कमी आहे. मागील एका वर्षभरात अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 45.4 टक्क्यांनी वाढली आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 157.65 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 27 July 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x