11 January 2025 9:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 3 शेअर्ससाठी BUY रेटिंग, टेक्निकल चार्टवर तुफान तेजीचे संकेत

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | भारतातील ऑटो स्टॉक्समध्ये जबरदस्त वाढीचे संकेत मिळत आहेत. ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँक आणि वित्तीय सेवा फर्म UBS ने अशोक लेलँड आणि अपोलो टायर्स स्टॉकची रेटिंग न्यूट्रल वरून अपग्रेड करून BUY केली आहे. तसेच M&M स्टॉकची रेटिंग न्यूट्रल केली आहे. UBS ने 2025-27 या वर्षासाठी वाहन उत्पादन क्षेत्रातचा EBITDA वाढीचा अंदाज 3-6 टक्के ठेवला आहे.

भारतीय वाहन कंपन्यांनी मागील जून तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. अशा काळात तज्ञांनी गुंतवणुकदारांना वरील तीन ऑटो स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात.

अशोक लेलँड :
UBS फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 280 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढले आहेत. जून तिमाहीत या कंपनीने आपल्या स्वतंत्र निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 9 टक्के घट नोंदवली आहे. आज मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.30 टक्के घसरणीसह 253.02 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अपोलो टायर्स :
UBS फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 640 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 28 जुलै रोजी हा स्टॉक 550 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 13.7 टक्के घसरून 410.3 कोटी रुपयेवर आला होता. आज मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.100 टक्के घसरणीसह 551.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

M&M :
UBS फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 3000 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 28 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 2,881 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.67 टक्के घसरणीसह 2,913.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 30 July 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x