
ATM Card Benefits | एटीएम कार्डवर उपब्ध आहे तब्बल 10 लाखांचा विमाआजकाल प्रत्येक व्यक्तीकडे एटीएम कार्ड उपब्ध आहे. बँकेत जर तुम्ही सेविंग अकाउंट सुरू केले असेल तर तुम्हाला एक कीट दिला जातो. यामध्ये तुमचे चेक बुक, एटीएम कार्ड आणि अन्य काही सेवा असतात. यातील एटीएम कार्ड आपल्या नेहमीच वापरत येते. पैसे काढण्यासाठी बँकेत जाऊन तासंतास उभे राहण्यापेक्षा घराजवळ असलेल्या एटीएममधून आपल्याला हवी असलेली रक्कम सहज काढता येते. एवढेच नाही तर अगदी कोणत्याही शॉपिंग मॉलमध्ये अथवा खरेदी केलेल्या वस्तूचे ऑनलाईन पेमेंट करताना देखील याचा खूप फायदा होतो.
तसेच या एटीएम कार्डचा आणखीन एक मोठा फायदा आहे. ज्याची माहिती कवितच काही लोकांना आहे. या सेवेतून तुम्हाला मोठी नुकसान भरपाई मिळते. मात्र आजही अनेक लोकांना एटीएम कार्डच्या या फायद्याविषयी जास्त माहिती नाही. त्यामुळे आज या बातमीमधून तुमचे एटीएम कार्ड तुमची झालेली नुकसान भरपाई कशी काय भरून काढते हे जाणून घेऊ.
एटीएम देते विमा संरक्षण
अनेक बँका आपल्या ग्राहकांना त्यांच्या विमा पॉलिसी नुसार अपघाती आणि मृत्यू विमा देत असतात. हे एक प्रकारे आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट घटनेसाठी कवच असते. अशात आता हे कवच अनेक बँका एटीएम कार्डवर देखील देतात. हे कवच 50 हजार ते 10 लाखांपर्यंत आहे. हे कवच ज्या व्यक्तीचे बँक खाते सातत्याने सुरू आहे त्याच व्यक्तीला दिले जाते.
अशी मिळवा नुकसान भरपाई
एटीएम विम्यामध्ये जेव्हा एटीएम धारक व्यक्तीचा अपघात किंवा मृत्यू झाला असेल तेव्हा त्यांचे नातेवाईक यासाठी मागणी करू शकतात. येथे अपंगत्व आलेल्या व्यक्तीला देखील नुकसान भरपाई दिली जाते. तसेच घटना घातल्यावर त्याची माहिती 3 ते 5 दिवसांत बँकेत द्यावी लागते. त्यानंतर बँक सदर व्यक्तीने 60 दिवसांत व्यवहार केले आहेत का हे तपासले. जर व्यक्ती आजारी असेल तर रुग्णालयातील सर्व कागदपत्रे सादर करावी लागतात. तसेच मृत्यू झाला असेल तर पोस्टमार्टम रिपोर्ट, मृत्यू पात्र, पोलीस पात्र अशा गोष्टी सादर कराव्या लागतात.
जेव्हा अपघात आणि मृत्यू अशा घटना घडतात तेव्हा याचा जास्त फायदा होतो. नुकसान भरपाई मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीचे बँक खाते ज्या शाखेत होते तेथे तुम्हाला हा दावा करता येतो. अन्य कोणत्याही शाखेत गेले असता यात तुमची मदत केली जात नाही. यासाठी ज्या ब्रांचमध्ये खाते आहे त्याच बँकेत अर्ज करावा लागतो. आता तुम्हाला देखील तुमच्या एटीएम कार्डवर विमा घ्यायचा असेल तर त्यावर कोणती सुविधा आहे हे तुम्हाला संबंधित बँकेत जाऊन माहीत करून घ्यावे लागले.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.




























