17 November 2024 4:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | नवीन IPO आला रे, एकाच दिवसात पैसे दुप्पट होणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, रोज अप्पर सर्किट हिट, 1 वर्षात 516% परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, जेफरीज ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला - NSE:HAL Money Formula 12x30x12 | हा एक फॉर्मुला बनवेल करोडपती, योजनेत गुंतवा केवळ 1000 रुपये, कमवा पैसाच पैसा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपग्रेड, शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
x

ATM Free Insurance | तुमच्या एटीएम कार्डवर 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत मिळतो, त्याचा लाभ कसा घ्यायचा जाणून घ्या

ATM Free Insurance

ATM Free Insurance | बँकिंगशी संबंधित आर्थिक व्यवहार करण्यासाठी आपल्या एटीएम कार्डची विशेष गरज असते. आज देशभरात जवळपास प्रत्येकाकडे एटीएम कार्ड आहे. ते आल्यानंतर देशात कॅशलेस व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. याशिवाय रोखावरील आपले अवलंबित्वही कमी झाले आहे. एटीएम कार्डने आर्थिक व्यवहारत पारदर्शकता आणि सुरक्षितता आणण्याचे काम केले आहे. या कारणास्तव, गेल्या काही वर्षांत त्याचा वापर लक्षणीय वाढला आहे.

आज आपण वस्तू खरेदीसाठी आणि इतर अनेक आर्थिक व्यवहारांसाठी एटीएम कार्डचा वापर करतो. त्याच वेळी, तुम्हाला हे माहित नसेल की तुमच्या एटीएम कार्डमध्ये काही विशेष फायदे देखील असतात. मात्र, माहितीच्या अभावामुळे एटीएम कार्डसोबत मिळणारे हे फायदे लोक घेऊ शकत नाहीत. या लेखात आज आम्ही तुम्हाला एटीएम कार्डवर उपलब्ध असलेल्या एका खास सुविधेबद्दल सांगणार आहोत.

मोफत विमा सुविधाही :
एटीएम कार्डसह तुम्हाला मोफत विमा सुविधाही दिली जाते. हे अपघात विमा संरक्षण असते. जेव्हा बँकेकडून तुम्हाला एटीएम कार्ड जारी केले जाते. त्यादरम्यान, तुम्हाला अपघात किंवा अकाली मृत्यूसाठी विमा संरक्षण देखील दिले जाते.

फार कमी लोक त्यावर दावा करतात :
देशातील मोठ्या संख्येने एटीएम कार्डधारकांना या विमा सुविधेची माहिती देखील नसते. यामुळे फार कमी लोक त्यावर दावा करतात आणि त्याचा लाभ घेतात. तुम्ही जर कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा बिगर राष्ट्रीयीकृत बँकेने दिलेले एटीएम कार्ड किमान 45 दिवसांपासून वापरत असाल तर या प्रकरणात, तुम्ही एटीएम कार्डवर उपलब्ध असलेल्या विमा सुविधेवर दावा करू शकता.

तथापि, एटीएमवर उपलब्ध असलेले विमा संरक्षण हे श्रेणीच्या आधारावर ठरवले जाते. आपल्याकडे क्लासिक ATM कार्ड असल्यास त्यावर तुम्हाला 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. प्लॅटिनम ATM कार्डवर 2 लाख रुपये चे विमा संरक्षण मिळते. मास्टर ATM कार्डवर 50 हजार रुपये विमा संरक्षण मिळते. प्लॅटिनम मास्टर ATM कार्डवर 5 लाख रुपये ची विमा सुरक्षा दिली जाते. तर व्हिसा डेबिट कार्डवर 1.5-2 लाख रुपये ची विमा सुरक्षा दिली जाते. याशिवाय जर तुम्ही जन धन बँक खाते उघडले असेल आणि तुमच्याकडे रुपे डेबिट कार्ड असेल तरी देखील तुम्हाला 1-2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ATM Free Insurance facility on ATM card provided by bank to its account holder on 6 August 2022

हॅशटॅग्स

ATM Free Insurance(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x