18 November 2024 9:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Australian Premium Solar Share Price | या शेअरने अवघ्या 2 दिवसात दिला 40% परतावा, खरेदीनंतर संयम श्रीमंत करेल

Australian Premium Solar Share Price

Australian Premium Solar Share Price | नुकताच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बजेटमध्ये सोलर पॅनेलबाबत केलेल्या घोषणेमुळे अनेक सोलर पॅनल बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. असाच एक स्टॉक आहे, ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर इंडिया लिमिटेड कंपनीचा. या कंपनीचे शेअर्स अक्षरशः 20 टक्केचा अप्पर सर्किट हीट करून गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 272.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 327.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच केंद्रातील मोदी सरकारने आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतातील एक कोटी कुटुंबांना 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली. ही मोफत वीज सौर ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून दिली जाणार आहे. यासाठी जवळपास एक कोटी घरांच्या छतावर रुफटॉप सोलर संयंत्र बसवण्यात येणार आहेत. ही बातमी येताच सोलर पॅनल बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी सुरू झाली.

ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर कंपनीचे शेअर्स जानेवारी 2024 या महिन्यातच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीचे शेअर्स NSE SME निर्देशांकावर 140 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध झाले होते. या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 54 रुपये किमतीवर हा स्टॉक इश्यू केला होता. या किमतीच्या तुलनेत शेअर 159.2 टक्के वाढीसह सूचीबद्ध झाला होता. IPO इश्यू किमतीच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स आता 405 टक्के मजबूत झाले आहेत.

ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर इंडिया लिमिटेड कंपनीचा IPO 11 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 54 रुपये जाहीर केली होती. या कंपनीने एका लॉटमध्ये 2,000 शेअर्स ठेवले होते. ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर इंडिया लिमिटेड ही कंपनी मुख्यतः सौर पॅनेल बनवण्याचा व्यवसाय करते.

ही कंपनी सौर यंत्रणेसाठी EPC सेवा देखील प्रदान करते. सध्या ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर इंडिया लिमिटेड कंपनी गुजरात राज्यातील साबरकांठा याठिकाणी 25375 चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेले उत्पादन केंद्र चालवत आहे. या उत्पादन केंद्राची एकूण क्षमता वार्षिक 200 मेगावॅट आहे. ही कंपनी सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे मोनोक्रिस्टलाइन आणि पॉलीक्रिस्टलाइन असे दोन्ही सौर पॅनेल बनवण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Australian Premium Solar Share Price NSE Live 05 February 2024.

हॅशटॅग्स

Australian Premium Solar Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x