17 April 2025 6:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टार्गेटप्राईस अपडेट - NSE: TATASTEEL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL
x

Avantel Share Price | कुबेर कृपा असलेला अवांटेल शेअर! फक्त 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोड रुपयात परतावा मिळाला

Avantel Share Price

Avantel Share Price | शेअर मार्केटमध्ये चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस कमाई करत येते. मात्र स्टॉक मार्केटमध्ये भरपूर जोखीम असते आणि काही वेळा तर गुंतवणूकदारांचे पैसे बुडतात देखील. म्हणून गुंतवणूकदारांनी नेहमी मजबूत कामगिरी असणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले पाहिजे. शेअर बाजारात असे अनेक कंपन्या आहेत, ज्यांचे शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देतात. असाच स्टॉक अवांटेल लिमिटेड कंपनीचा देखील आहे.

अवांटेल लिमिटेडया कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना घसघशीत नफा कमावून दिला आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 20 पैसेवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 250 रुपयेच्या पार गेला आहे. 12 मार्च 2003 रोजी शेअरची अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 पैसेवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.81 टक्के वाढीसह 256.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

2004 साली अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स पहिल्यांदा 1 रुपयेच्या पार गेले. 2017 पर्यंत या कंपनीचे शेअर्स 2 रुपये ते 8 रुपये किमतीच्या दरम्यान ट्रेड करत होते. 2017 साली या कंपनीच्या शेअरने पहिल्यांदा 10 रुपये किंमत पार केली होती. 2022 साली शेअरची किंमत 50 रुपयेच्या पार गेली. आणि आता 2023 मध्ये हा स्टॉक 250 रुपयेच्या शेअरच्या पार गेला आहे.

2023 या वर्षात अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स पहिल्यांदा 100 रुपये ओलांडून गेल. त्यानंतर याच वर्षात शेअरने 200 रुपये किमतीला देखील ओलांडले. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत. 24 ऑगस्ट 2023 रोजी अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 259.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 49.80 रुपये होती.

जर तुम्ही 2003 साली अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 20 पैसे किमतीवर असताना 10000 रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कोट्यवधीमध्ये गेले असते. 20 पैशात तुम्हाला 10,000 रुपयेमध्ये 50000 शेअर्स मिळाले असते. आणि आता तुमच्या 50000 शेअर्सचे एकूण मूल्य 1,29,50,000 रुपये झाली असते. इतका मोठा परतावा फक्त दीर्घ कालीन गुंतवणुकदारांना मिळत असतो, म्हणून शेअर बाजारातील तज्ञ नेहमी दीर्घ कालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Avantel Share Price today on 25 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Avantel Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या