18 November 2024 9:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Avanti Feeds Share Price | 1 रुपयांच्या शेअरने नशीब पालटलं, कुबेर कृपा असणाऱ्या 'या' शेअर खरेदीचा विचार करा

Avanti Feeds Share Price

Avanti Feeds Share Price | अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्सने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत वाढत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अवंती फीड्स कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांच्या वाढीसह 580.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत.

मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1 रुपयेवरून वाढून 580 रुपये किमतीवर पोहचली आहे. अवंती फीड्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देखील वाटप केले आहेत. शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी अवंती फीड्स कंपनीचे शेअर्स 10.56 टक्के वाढीसह 541.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

अवंती फीड कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2009 रोजी 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 580.80 रुपये किमतीवर पोहोचले होते. या काळात अवंती फीड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 57000 टक्के परतावा कमावून दिला आहे.

अवंती फीड्स कंपनीने जून 2018 मध्ये आपल्या शेअर धारकांना 1 : 2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. जर तुम्ही 27 मार्च 2009 रोजी अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 100,000 शेअर्स मिळाले असते. बोनस शेअर्स वाटप केल्यानंतर तुमच्या शेअर्सची संख्या 150000 झाली असती. सध्याच्या शेअर्सच्या किमतीनुसार तुमच्या एकूण गुंतवणुकीचे मूल्य 8.71 कोटी रुपये झाले असते.

मागील 10 वर्षांत अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3000 टक्के परतावा कमावून दिला आहे. 10 जानेवारी 2014 रोजी अवंती फीड्स कंपनीचे शेअर्स 18.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 जानेवारी 2024 रोजी अवंती फीड्स कंपनीचे शेअर्स 580.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 6 महिन्यांत अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात अवंती फीड्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 491 रुपये होती. मागील 5 दिवसात अवंती फीड्स स्टॉक 30 टक्के मजबूत झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Avanti Feeds Share Price NSE Live 13 January 2024.

हॅशटॅग्स

Avanti Feeds Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x