30 January 2025 6:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमचा सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात खराब झालाय, मग इथे लक्ष द्या, तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत होईल EPFO Passbook | पगारदारांच्या खात्यात EPF चे 1.07 कोटी रुपये जमा होणार, महिना 25,000 रुपये नोकरदारांचाही फायदा होणार 5G Mobile Under 10000 | जबरदस्त 5G स्मार्टफोनसाठी खास ऑफर, खिशाला परवडतील 'हे' स्वस्त 5G स्मार्टफोन्स Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 38 रुपयांचा रिलायन्स पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RPOWER Loan on Aadhar Card | आधार कार्डावरून मिळवता येईल 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज, 'या' योजनेबद्दल ठाऊक आहे का RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
x

Axis Bank Share Price | ऍक्सिस बँकेचा स्टॉक 1200 रुपये वर जाईल? 42 टक्के परतावा मिळू शकतो, खरेदी करणार?

Axis Bank Share Price

Axis Bank Share Price | खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँकपैकी एक ‘अॅक्सिस बँक’ च्या शेअर्समध्ये शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी 1 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. ‘अॅक्सिस बँक’ आणि ‘सिटीग्रुप इंडिया’ यांच्यातील यशस्वी डीलची बातमी येताच स्टॉकमध्ये तेजी आली. जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने ‘अॅक्सिस बँक’ स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. मागील 6 महिन्यांत ‘अॅक्सिस बँक’ स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 14 टक्के परतावा मिळवून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Axis Bank Share Price | Axis Bank Stock Price | BSE 532215 | NSE AXISBANK)

अॅक्सिस बँक स्टॉकची लक्ष किंमत :
ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने ‘अॅक्सिस बँक’ स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. यासोबतच त्यांनी स्टॉकवर प्रति शेअर किंमत 1200 रुपये लक्ष जाहीर केली आहे. 23 फेब्रुवारी 2023 रोजी या शेअरची किंमत 844 रुपये होती. तज्ज्ञांच्या मते सध्याच्या किमतीवरून हा बँकिंग स्टॉक 42 टक्के आणखी वाढू शकतो. मागील एका वर्षात या बँकिंग स्टॉकने लोकांना 16 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे.

ब्रोकरेज फर्मचे स्टॉकबाबत मत :
मॉर्गन स्टॅनले फर्मचे तज्ञ म्हणतात की, अॅक्सिस बँक आणि सिटीग्रुप इंडिया यांच्यात अधिग्रहण करार होणार आहे. Axis Bank 1 मार्च 2023 पर्यंत सिटीग्रुप इंडियाच्या ग्राहक युनिटचे संपादन करणार आहे. दोन्ही कंपन्यांकडून एकत्रीकरणाची पुढील तयारी सुरू करण्यात आली आहे. याबाबत कंपनीच्या शेअर धारकांची मान्यता देखील प्राप्त झाली आहे. मॉर्गन स्टॅनले फर्मचे तज्ञ म्हणतात की, अॅक्सिस बँक फ्रँचायझीच्या स्ट्रक्चरल टर्न अराउंडवर सकारात्मक राहते. FY24/25 पर्यंत अॅक्सिस बँकचा ROE 16 टक्के असू शकतो. अॅक्सिस बँकेच्या स्टॉकचे मूल्यांकन आकर्षक असल्याने तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Axis Bank Share Price in focus 532215 AXISBANK stock market live on 25 February 2023.

हॅशटॅग्स

#Axis Bank share price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x