7 January 2025 6:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, TCS शेअरमध्ये 39 टक्के तेजीचे संकेत, IT स्टॉक मालामाल करणार - NSE: TCS Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER EPF Withdrawal | पगारदारांनो, या कारणांचा वापर करून EPF खात्यातून पैसे काढू शकता, 90 लोकांना माहित नाही
x

Bank Account | आपलं बॅंक अकाउंट फ्रीज म्हणजे केव्हा गोठवलं जातं? कोणती कारणं त्यासाठी ग्राह्य धरली जातात लक्षात ठेवा

Bank Account

Bank Account | सर्व शासकीय बॅंका आरबीआयच्या नियमांवर कामकाज करत असतात. अशात अनेकदा काही व्यक्तींना त्यांचे अकाउंट फ्रीज होणार आहे असा मॅसेज येतो. कधी कधी बॅंक अकाउंट हॅक होऊ शकते अशा सुचना येतात. यात अकाउंट फ्रीज होते म्हणजे नेमकं काय होतं?  तसेच हे केव्हा होतं आणि कोण करतं?  असे प्रश्न तुमच्याही मनात येत असतील. त्यामुळे या बातमीतून याच विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

अकाउंट फ्रीज झाल्यावर काय होते
जेव्हा तुमचे खाते फ्रीज होते तेव्हा फक्त तुमचा पगार तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो. या व्यतीरीक्त तुम्ही कोणतेही व्यवहार करू शकत नाही. त्यामुळे तुमचे आधीचे चेक देखील वठवता येत नाहीत. म्हणजे तुमचे खात्यातील सर्व व्यवहार पुढील सुचना मिळेपर्यंत बंद राहतात. कोणीच तुमच्या खात्यात पैसे जमा करू शकत नाही. अन्य पैसे तुम्हाला काढता येत नाहीत.

असे झाल्यावर तुमचे ऑटो डेबिड पेमेंट गुंतून पडतात. यात वीजबिल, क्रेडिट कार्ड, म्युच्यूइल फंड, लोन यातील कोणतेच व्यवहार होत नाहीत. असे होण्यामागे बरीच कारणे आहेत. तसेच खाते फ्रीज का होते आणि ते कोण करू शकते. त्याचे अधिकार कुणाला असतो हे माहीत असने गरजेचे आहे.

यांना आहे अधिकार
बॅंक अकाउंट फ्रीज करण्याचे अधिकार फक्त आरबीआय, सिक्युरिटी बोर्ड एक्सचेंज ऑफ इंडिया, इन्कम टॅक्स अधिकारी आणि न्यायालय यांनाच आहेत. ज्यावेळी तुमच्या खात्यात मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फंड अशा मार्गाने आलेले पैसे आढळतात तेव्हा अशी कारवाई केली जाते. खात्यात अशा ठिकाणाहून पैसे येत असल्याचा बॅंकेला संशय आला तर बॅंक देखील असे करू शकते. त्या आधी संबंधीत खातेदारकाला एक नोटीस पाठवली जाते.

ही आहेत फ्रीज होण्याची कारणे
* नोटीस देऊनही कर्ज न भरणे
* थकीत कर न भरणे
* खात्यात संशयास्पद पैसे येणे
* खात्याचा टेरर फंडीगशी संबंध येणे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bank Account Why do banks freeze your accounts 22 October 2022.

हॅशटॅग्स

#Bank Account(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x