4 February 2025 1:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे, सोन्याचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला, 85 हजारांचा टप्पा ओलांडला, नवे दर तपासून घ्या Adani Power Share Price | तज्ज्ञांकडून अदानी पॉवर शेअरला 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Income Tax Return | स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा कोणाला होतो, जाणून घ्या नव्या आणि जुन्या टॅक्स रिजीममधील मर्यादा किती आहे IPO GMP | स्वस्त आयपीओ आला रे, IPO शेअरचा ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल SBI Home Loan | SBI बँकेकडून 30 लाखांचे गृहकर्ज हवे असेल तर, महिन्याला किती पगार असायला हवा इथे जाणून घ्या Bank Fixed Deposit | संकटकाळी बँकेतील FD मोडण्यापेक्षा 'या' गोष्टी करा, मुद्दलसह व्याज वाचेल, फायदा होईल Mutual Fund SIP | 4 वर्षांच्या आत मिळतील 50 लाख रुपये, कशा पद्धतीने म्युच्युअल फंडात गुंतवणूक कराल, इथे पहा
x

Bank Fixed Deposit | फायदे पाहून बँक एफडीमध्ये पैसे गुंतवत असाल तर एफडीचे हे तोटे देखील समजून घ्या

Bank Fixed Deposit

Bank Fixed Deposit | आपले जास्तीचे पैसे संभाळून ठेवण्यासाठी अनेक व्यक्ती फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे जमा करतात. याचा आपल्याला चांगला फायदा होइल या दृष्टीने पैसे जमा केले जातात. ही एक सुलभ आणि गुंतागुंत नसलेली पध्दत आहे. तसेच यात असलेली सुविधा आणि कर्ज, व्याज अशा सर्व बाबी लक्षात घेता तुम्ही देखील तुमचे पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले असतील. मात्र फिक्स डिपॉझिटचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे देखील आहेत. त्यामुळे तुमच्या पैशांवर असलेले तोटे नेमके कोणते आहेत हे माहित असणे गरजेचे आहे.

फिक्स डिपॉझिटच्या तोट्यांमध्ये कमी व्याजदर, पैसे काढण्यावर दंड, निधी लॉक-इन, निश्चित व्याज दर अशा गोष्टी आहेत. यात जेव्हा तुम्ही ठरावीक रकमेचे कर्ज घेता तेव्हा त्यावर व्याजदर अधिक असतो. तुलनेत जेव्हा तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवता तेव्हा मिळणारा व्याज दर कमी असतो. एफडी ही सध्याच्या घडीला महागाईच्या तुलनेत मागे आहे. रेपो दरात वाढ दिसल्यास हे दर वाढतात. महागाई नुसार व्यजदर वाढत नाही. रेपो दरात घट झाल्यावर त्याचा परिणाम व्याज दरावर होतो.

कालावधी विषयी :
तोट्यांविषयी बोलताना इथे कालावधी विषयी आग्रहाने सांगावे लागेल. कारण पैसे जमा करताना कालावधी ठरवून दिला जातो. त्या काळात जर काही संकट आले आणि तुम्हाला तुमच्या पैशांची गरज असेल तर तुम्ही एफडी मोडू शकता. मात्र यामुळे तुम्हाला दंड देखील भरावा लागतो. दंड भरावा लागू नये म्हणून गरज असताना आपले पैसे आपल्याला वापरता येत नाहीत. एक प्रकारे पैसे अडकल्याने आपण बुचकळ्यात पडतो.

त्यावर बॅंकेचा अधिकार :
स्वत: चे पैसे असूनही त्यावर बॅंकेचा अधिकार असतो. त्यामुळे मानसीक ताण देखील येतो. तसेच दंड भरून पैसे काढल्यास तुमचा व्याजदर देखील कमी होतो. सेविंग अकाउंटमध्ये हा धोका टाळता येतो. इथे एफडीच्या तुलनेत व्याजदर कमी असला तरी तुम्हाला गरज भासल्यास तुम्ही कधीही तुमचे पैसे काढू शकता. अनेकदा एफडीचा व्याजदर ५०,००० पेक्षा जास्त असेल तर त्यावर टॅक्स भरावा लागतो. याचा ग्रहकाला तोटा होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bank Fixed Deposit disadvantages need to know check details 13 October 2022.

हॅशटॅग्स

#Bank Fixed Deposit(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x