20 September 2024 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bigg Boss Marathi | वाइल्ड कार्ड सदस्य संग्रामवर प्रेक्षकांची नाराजगी "संग्राम; मोठा बैल झाला राव; ज्याच्यासाठी पाठवलं Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस करणार मालामाल - Marathi News IREDA Share Price | IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट, कमाईची संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Monthly Pension Money | 1000 रुपयांची गुंतवणूक प्रत्येक महिन्याला बनवेल लखपती, सरकारी पेन्शनचा फायदा घ्या - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, मजबूत तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, रॉकेट स्पीडने कमाई होणार, यापूर्वी 1171% परतावा दिला - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक शेअरची तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
x

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रवर RBI ची मोठी कारवाई, ग्राहकांसाठी महत्वाची बातमी

Bank of Maharashtra

Bank of Maharashtra | केवायसीसह निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ महाराष्ट्रला 1.27 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने 8 ऑगस्ट 2024 च्या आदेशाद्वारे ‘लोन सिस्टीम फॉर बँक क्रेडिट डिस्ट्रीब्युशन’, ‘सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क इन बँक्स’ आणि ‘नो योर कस्टमर’ या संदर्भात आरबीआयने जारी केलेल्या काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रला 1.27 कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

नोटीसला बँक ऑफ महाराष्ट्रने दिलेले उत्तर, वैयक्तिक सुनावणी दरम्यान केलेले तोंडी म्हणणे आणि अतिरिक्त युक्तिवाद यांचा विचार केल्यानंतर आरबीआयने बँकेवरील आरोप खरे असल्याचे निदर्शनास आणून दिले.

कोट्यवधींचा दंड
रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ महाराष्ट्र, हिंदुजा लेलँड फायनान्स आणि पूनावाला फिनकॉर्प वर कारवाई केली आहे. ही बँक आणि दोन फायनान्स कंपन्यांनी केवायसीसह अन्य काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

दोन फायनान्स कंपन्यांना लाखांचा दंड
हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेडवरही आरबीआयने कारवाई केली आहे. २०१६ मधील काही नियम आणि केवायसी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल बँकेने फायनान्स कंपनीला 4 लाख 90 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडला आरबीआयने 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

News Title : Bank of Maharashtra on RBI radar after huge penalty 17 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x