Bank RD Vs SIP | बँक RD फायद्याची की म्युचुअल फंड SIP? अधिक पैसा कुठे? येथे समजून घ्या फायद्याचं गणित

Bank RD Vs SIP | वाढती महागाई आणि वाढत्या व्याजदरामुळे लोकांना तुटपुंज्या पगारात आपले जीवन व्यतीत करणे, अवघड जात आहे. त्यामुळे आता गुंतवणूक करणे आणि परतावा कमविणे ही काळाची गरज बनली आहे. बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बरेच लोक ज्या बँकेत आपले खाते असते, त्या बँकेतच आरडी स्कीममध्ये पैसे जमा करत असतात. या योजनेत दरमहा पैसे जमा केल्यानंतर पाच वर्षांनंतर ठराविक व्याज दराने चांगला परतावा दिला जातो. जोखीम नको असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी बँक आरडी हा एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. परंतु जर तुम्ही थोडी जोखीम पत्करून अधिक परतावा कमवू इच्छीत असाल तर म्युचुअल फंड SIP योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
अलिकडच्या काही वर्षांत म्युचुअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये भारतात म्युचुअल फंड SIP मध्ये 13041 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. SIP मध्ये आतापर्यंत सर्वाधिक गुंतवणूक 2022-23 या आर्थिक वर्षात आली आहे.
Bank RD स्कीम vs SIP :
बँक रिकरिंग डिपॉझिट्स या योजनेत तुम्ही दर महा पूर्वी ठरलेल्या व्याज दरानुसार पैसे जमा करू शकता. RD स्कीम लोकांना हमी परतावा मिळवून देते. यासोबतच करात गुंतवणूकदारांना कर सूट आणि इतर फायदेही मिळतात. तर एसआयपी म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणुकदार दरमहा एक ठराविक रक्कम जमा करतो, आणि त्यावर त्याला चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळतो. SIP योजनेत दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास उत्कृष्ट परतावा मिळतो. SIP मध्ये गुंतवणुकदार दरमहा किंवा ठराविक अंतराने पैसे जमा करू शकतो.
दोन्ही योजनेतील मध्ये सामाईक गोष्टी :
बँक आरडी स्कीम आणि म्युचुअल फंड SIP मध्ये सामायिक गोष्ट अशी की, या दोन्ही योजनेत मासिक किंवा त्रैमासिक आधारावर गुंतवणूक करता येते. या योजनांचा मॅच्युरिटी कालावधी पाच वर्ष निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय या दोन्ही योजना केव्हाही बंद केल्या जाऊ शकतात. योजना बंद केल्यास काही अटींनुसार कपात करून उर्वरित पैसे गुंतवणूकदारांना परत केले जातात. या योजनेत नियमित गुंतवणूक न केल्यास खाते गोठवले जाऊ शकतात.
गुंतवणूकीचा फायदा :
बँक आरडी मध्ये गुंतवणूकदार 5.8 ते 7 टक्के या वार्षिक व्याज दराने जोखीम न घेता गुंतवणूक करून जबरदस्त परतावा कमवू शकतात. SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास वार्षिक सरासरी 12-15 टक्के व्याज परतावा सहज मिळू शकतो. जर बाजाराची स्थिती तेजीत असेल तर SIP योजनेत दीर्घ मुदतीसाठी 15 ते 18 टक्के वार्षिक व्याज परतावा मिळवता येतो. म्युच्युअल फंड SIP मधील गुंतवणूक फायदेशीर आहे, कारण त्यावर दीर्घ काळात चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मिळतो.
उदाहरणावरून परताव्याचे गणित समजून घ्या :
जर रमेश बँक आरडी मध्ये दरमहा 5000 रुपये गुंतवणूक करतो. आणि सुरेश म्युचुअल फंड SIP मध्ये दरमहा 5000 रुपये जमा करतो. तर पाच वर्षांत रमेशची जमा झालेली प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम 3 लाख रुपये असेल. बँक आरडीमध्ये कमाल 7 टक्के दराने व्याज मिळाला तर रमेशला 59663 रुपये परतावा मिळेल. म्हणजेच बँक RD मधून रमेशला परिपक्वता रक्कम 3 लाख 59 हजार 663 रुपये मिळेल. एसआयपीच्या बाबतीत, सुरेशला वार्षिक सरासरी किमान 12-15 टक्के परतावा सहज मिळेल. या हिशोबाने सुरेशला 1 लाख 12 हजार 432 रुपये व्याज परतावा मिळेल. आणि योजनेचा परिपक्वता कालावधी पूर्ण झाल्यावर सुरेशला 4,12,432 रुपये मिळतील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Bank RD Vs SIP scheme for investment and earning Huge Return on 06 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB