23 December 2024 4:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch
x

Basilic Fly Studio IPO | अबब! कुबेर पावणार! हा IPO शेअर 92 रुपयाचा, शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 288% परतावा देऊ शकतो

Basilic Fly Studio IPO

Basilic Fly Studio IPO | नुकताच बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या स्मॉल कॅप कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अप्रतिम प्रतिसाद दिला आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 66 कोटी रुपये होता. ज्यावर गुंतवणूकदारांनी 10,000 कोटी रुपये पेक्षा अधिक बोली लावली आहे. बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीचा IPO 355 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ ही चेन्नई स्थित कंपनी व्हिज्युअल इफेक्ट स्टुडिओ चालवते. आणि ही कंपनी कॅनडा, यूकेमध्ये देखील व्यवसाय करते. बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीने अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपले योगदान दिले आहे. बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीने अनेक हॉलीवूड मधील Avengers : Endgame, SpiderMan No Way Home आणि Top Gun : Maverick यामध्ये काम केले आहे.

बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी इतका प्रतिसाद दिला की, IPO एकूण 355 पट सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 409.12 पट सबस्क्राइब झाला होता. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 549.07 पट अधिक सबस्क्राईब झाला होता आणि क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 116.34 पट अधिक खरेदी झाला होता.

बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 280 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या IPO मधे शेअरची किंमत बँड 92-97 रुपये निश्चित करण्यात आली होती.

जर बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीच्या शेअर्स 97 रुपये या अप्पर प्राईज बँडवर वाटप केले गेले, आणि 280 रुपये ग्रे मार्केट प्रीमियम टिकून राहिला तर हा स्टॉक 377 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी 288 टक्के परतावा मिळू शकतो. या कंपनीचा आयपीओ 1 सप्टेंबर रोजी 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता.

या IPO मध्ये 60.5 कोटी रुपये मुल्याचे फ्रेश इक्विटी शेअर्स आणि 6 लाख शेअर्सची ऑफर फॉर सेल जाहीर करण्यात आली होती. या कंपनीचे शेअर्स 13 सप्टेंबर 2026 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहेत. 8 सप्टेंबर 2023 रोजी गुंतवणूकदारांना स्टॉक वाटप केले जाईल. हा स्टॉक NSE SME या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केला जाणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Basilic Fly Studio IPO for investment on 06 September 2023.

हॅशटॅग्स

Basilic Fly Studio IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x