7 January 2025 6:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, TCS शेअरमध्ये 39 टक्के तेजीचे संकेत, IT स्टॉक मालामाल करणार - NSE: TCS Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER
x

BCL Industries Share Price | बापरे! बीसीएल इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना 3 वर्षात 1500% परतावा दिला, शेअर पुढेही ताकद दाखवणार

BCL Industries Share Price

BCL Industries Share Price | कोविड नंतर भारतीय शेअर बाजारात इतकी तेजी आली की, गुंतवणुकदार अक्षरशः मालामाल झाले होते. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक बीसीएल इंडस्ट्री कंपनीचा आहे. 18 सप्टेंबर 2023 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 588 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक प्रॉफिट बुकिंगला बळी पडला आहे.

बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 537.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील साडेतीन वर्षांत बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1500 टक्के परतावा कमावून दिला आहे.

याकाळात शेअरची किंमत 31 रुपये वरून वाढून 550 रुपये किमतीवर पोहोचली आहे. आज शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज स्टॉक 1.14 टक्के घसरणीसह 533.00 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील एका वर्षात बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत 315 रुपये वरून 550 रुपयेवर पोहचली आहे. या काळात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 75 टक्के नफा कमावला आहे. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये येण्याचे कारण म्हणजे, कंपनीने आपल्या डिस्टिलरीज व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची घोषणा केली आहे. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाने भटिंडा तेल युनिटला भटिंडा डिस्टिलरीच्या ठिकाणी हलवण्यास हिरवा कंदील दिला आहे.

बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाचा असा विश्वास आहे की, या स्थलांतरामुळे कंपनीच्या व्यवस्थापन बँडविड्थमध्ये सुधारणा होईल. आणि उच्च मार्जिन डिस्टिलरी विभागावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळेल. जून 2023 ला संपलेल्या तिमाहीत बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने खाद्यतेल व्यवसायातु 43.7 टक्के महसूल संकलित केला होता. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे संचालक मंडळ पुढील काही तिमाहींमध्ये खाद्यतेलाच्या व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी आणखी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BCL Industries Share Price 29 September 2023.

हॅशटॅग्स

#BCL Industries Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x